बस-आयशर टेम्पोत अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:11 AM2021-07-08T04:11:37+5:302021-07-08T04:11:37+5:30

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, शहादा डेपोची बस क्रमांक (एम १४ बी.टी.२३०९) ही शहादाहून नाशिककडे जात असताना पिंपळगाव बसवंत-वणी ...

Bus-Eicher Tempot Accident | बस-आयशर टेम्पोत अपघात

बस-आयशर टेम्पोत अपघात

Next

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, शहादा डेपोची बस क्रमांक (एम १४ बी.टी.२३०९) ही शहादाहून नाशिककडे जात असताना पिंपळगाव बसवंत-वणी चौफुलीजवळील उड्डाणपुलाच्या विरुद्ध दिशेने आयशर (क्रमांक एम.एच २०सी.टी२४४९) येत होता. अचानक आयशरने महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, उड्डाणपुलाहून भरधाव येणाऱ्या बसने आयशरला जोरदार धडक दिली. त्यात आयशरचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. त्यात आयशरमध्ये असलेले चालक मुक्ततार अली गुलाब अली सयद ( ५५, रा. रामनगर, शीरसोहळी, जळगाव) तर निशार सुभान खाटिक (६२, रा. परिपाळा, ता. जळगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले. बसमधील चालकासह शेख अलमेश गब्बार (२३), भरतसिंग नारायणसिंग गिरासे (७५) हे प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे असून बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील अन्य प्रवासी बचावले आहेत. या अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

इन्फो

बॅरिकेड असते तर...

वणी चौफुलीच्या मधोमध मोठी जागा आहे. त्या ठिकाणी अगोदर मोठमोठे मातीचे ढिगारे होते. त्यामुळे तिकडून कोणतेही वाहन जाणे शक्य नव्हते. मात्र, मातीचे ढिगारे उचल्यावर ती जागा मोकळी झाली आणि बॅरिकेड नसल्याने महामार्गावर त्या रस्त्याने सहज वाहन जाऊ शकते. त्यामुळे नाशिकच्या दिशेने जाण्यासाठी काही वाहनधारक त्या रस्त्याचा उपयोग करतात. सदर अपघातातील आयशरचालक देखील त्या वणीचौफुलीच्या विरुद्ध दिशेने आला. त्यामुळे सदर अपघात घडला. बॅरिकेड असते तर हा अपघात टळला असता.

इन्फो

बसचालकाचे प्रसंगावधान

महामार्गावर विरुद्ध दिशेने येत असलेला आयशर अचानक महामार्गाच्या मधोमध आला. हे बसचालकाच्या लक्षात येताच त्याने बसवर ताबा मिळविला आणि आयशरच्या समोरील भागाला टक्कर दिली. यामुळे या अपघातात बसमधील फक्त दोनच प्रवाशांना किरकोळ इजा झाल्या. बसचालकामुळे मोठी जीवितहानी टळली.. मागील बाजूला धक्का बसला असता तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी चर्चा प्रवाशांमध्ये होती.

फोटो- ०७ पिंपळगाव ॲक्सीडेंट१/२

070721\img_20210707_132004.jpg~070721\07nsk_24_07072021_13.jpg~070721\07nsk_25_07072021_13.jpg

अपघरातील~फोटो- ०७ पिंपळगाव ॲक्सीडेंट~फोटो- ०७ पिंपळगाव ॲक्सीडेंट१/२

Web Title: Bus-Eicher Tempot Accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.