लोकमत न्यूज नेटवर्कदेवळा : महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने कांदा 20 रु पये प्रति किलो दराने सरकारने खरेदी करावा अशा मागणीचे निवेदन आमदार नितीन पवार यांना देण्यात आले.यावेळी देवळा बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे प्रदेश संघटक कृष्णा जाधव, जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, विलास रौदळ, ओंकार पाटील, बाळासाहेब शेवाळे ,राजेंद्र भामरे, समता परिषद कळवण तालुकाध्यक्ष शशिकांत बागुल, संदीप पगार,विनोद खैरनार, सुनील मोरे, सुनील बोरसे, संजय शेवाळे, लक्ष्मण रौदळ, दादाजी जाधव आदींसह शेतकरी उपस्थित होते.सध्या कांदा 5 ते 6 रूपये प्रति किलो दराने विकला जात आहे. कांद्याला उत्पादन खर्च प्रतिकिलो 12 रु पये येत असतांना सद्या मिळणार्या या दराने शेतकर्यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही. कांदा दर वाढल्यानंतर विदेशातून कांदा आयात कस्न सरकार कांद्याचे दर पाडण्याचे काम करते. आज कांदा मातीमोल भावाने विकला जात आहे. या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी थेट शेतकर्यांचा कांदा 20 रु पये प्रति किलो या दराने खरेदी करावा यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून कांदा उत्पादकांना न्याय देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
देवळा येथे कांदा २० रु पये प्रति किलोने खरेदी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 10:03 PM
देवळा : महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने कांदा 20 रु पये प्रति किलो दराने सरकारने खरेदी करावा अशा मागणीचे निवेदन आमदार नितीन पवार यांना देण्यात आले.
ठळक मुद्देआज कांदा मातीमोल भावाने विकला जात आहे.