निर्बंध काळात नागरिकांना केबलचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 09:54 PM2021-04-28T21:54:03+5:302021-04-29T00:39:27+5:30
मालेगाव कॅम्प : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंसाठीच ठरावीक वेळेत घराबाहेर पडता येत आहे. अशा वेळी नागरिक घरात बंदिस्त झाले असताना त्यांना मनोरंजनासाठी केबल टीव्ही मोठा आधार ठरत आहे.

कोरोनाच्या निर्बंधांमुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. सध्या सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूसाठीच बाहेर निघण्याची मुभा देण्यात आली आहे. शहरातील मनोरंजनाची ठिकाणे, तरण तलाव, रिसॉर्ट, हाँटेल, सिनेमागृहे आदी कुलूपबंद आहेत. त्यामुळे मोबाइल आणि केबल टीव्ही हेच एकमेव मनोरंजनाचे साधन उरले आहे. जे घरबसल्या उपलब्ध आहे. शहरात हजारो घरांमध्ये केबल जोडण्या केबल चालकांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे मनोरंजनाचा लाभ केबल ग्राहक नागरिकांना होत आहे. केबलच्या शेकडो वाहिन्या घरात बसलेल्या नागरिकांसाठी मनोरंजनाच्या साधन ठरल्या आहेत. छोट्या पडद्यावर विविध धारावाहिक मालिकांपासून क्रिकेट शौकिनांची पर्वणी असलेली आयपीएल स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचा जास्तीत जास्त वेळ त्यात घालवत आहेत.
कोरोना निर्बंध काळात केबल व्यवसाय करणे काहीसे अडचणीचे होते. आर्थिक वसुली, तक्रारीचे निवारण करताना त्रास होतो. परंतु ग्राहकांना सेवा देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
- संतोष जगताप, केबल चालक, मालेगाव
निर्बंधांच्या काळात घरी वेळ घालवण्यासाठी केबलचा मोठा आधार मिळत आहे. अगदी किरकोळ खर्चात महिनाभर मनोरंजन मिळत आहे ही फार चांगली गोष्ट आहे.
- हिरालाल चौधरी, केबल ग्राहक, मालेगाव