आडगावला बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:14 AM2019-03-21T00:14:25+5:302019-03-21T00:14:45+5:30
आडगाव शिवारातील माडसांगवी रोडवर साई मंदिराजवळील एकनाथ धारबळे यांच्या मळ्यात मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास बिबट्याने वासरावर हल्ला केला. त्यावेळी वासराजवळच बांधलेल्या गाईने आरडाओरडा केल्यामुळे धारबळे कुटुंबीयांच्या लक्षात आले.
आडगाव : आडगाव शिवारातील माडसांगवी रोडवर साई मंदिराजवळील एकनाथ धारबळे यांच्या मळ्यात मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास बिबट्याने वासरावर हल्ला केला. त्यावेळी वासराजवळच बांधलेल्या गाईने आरडाओरडा केल्यामुळे धारबळे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ सर्व लाईट चालू करून आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने पलायन केले. पण या हल्ल्यात वासरू जखमी झाले असल्याची घटना घडली आहे.
आडगाव शिवारातील माडसांगवी रोडवर साई मंदिराजवळील एकनाथ धारबळे यांच्या मळ्यात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने गाय व वासरू बांधलेल्या ठिकाणी वासरूवर हल्ला केला. त्यात गायीचे वासरू जखमी झाले, परंतु बिबट्याच्या या हल्ल्याने जवळच असलेल्या गाईने जोरजोरात हंबरायला सुरुवात केली. त्यामुळे घरात झोपलेल्या धारबळे यांनी तत्काळ बाहेर येऊन आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला.
या परिसरात बिबट्याचे ठसे आढळून आल्याने तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर हा हल्ला बिबट्यानेच केला असून, या ठिकाणी कॅमेरा बसविण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले असून, बिबट्याच्या या हल्ल्यामुळे आडगाव मळे परिसरात घबराट पसरली आहे.