‘राफेल’ खरेदीच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी झालो याचा मला अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 11:49 PM2020-07-31T23:49:16+5:302020-08-01T00:59:50+5:30

धुळे : युद्धामध्ये अतिशय घातक ठरणारे राफेल हे अद्ययावत विमान खरेदीची करारासाठी फ्रान्सचे संरक्षण मंत्री जीन यवेस ले ड्रायन भारतात सप्टेंबर २०१६ मध्ये आले होते. त्यावेळी भारताचे माजी संरक्षण मंत्री स्वर्गीय मनोहर परिकर यांच्यासोबत तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री म्हणून करारास अंतिम स्वरुप देण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत मी सहभागी झालोे, याचा मला अभिमान, असल्याची प्रतिक्रीया देत तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री व विद्यमान खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.

The campaign to get me directly involved in the ‘Raphael’ purchase process | ‘राफेल’ खरेदीच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी झालो याचा मला अभियान

फ्रांसचे संरक्षण मंत्री जीन-यवेस ले ड्रायन यांच्यासोबत राफेलसंदर्भात चर्चा करतांना भारतचे माजी संरक्षण मंत्री स्व. मनोहर परिकर व भारताचे तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री तथा विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे.

Next
ठळक मुद्देआठवणीला उजाळा : तत्कालिन संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे

धुळे : युद्धामध्ये अतिशय घातक ठरणारे राफेल हे अद्ययावत विमान खरेदीची करारासाठी फ्रान्सचे संरक्षण मंत्री जीन यवेस ले ड्रायन भारतात सप्टेंबर २०१६ मध्ये आले होते. त्यावेळी भारताचे माजी संरक्षण मंत्री स्वर्गीय मनोहर परिकर यांच्यासोबत तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री म्हणून करारास अंतिम स्वरुप देण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत मी सहभागी झालोे, याचा मला अभिमान, असल्याची प्रतिक्रीया देत तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री व विद्यमान खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.
फ्रान्सचे संरक्षण मंत्री जीन यवेस ले ड्रायन यांच्यासोबत आलेल्या अधिकाऱ्यांची टीम आली होती. त्यांच्यासोबत खरेदी करारासंदर्भात चर्चेत राफेल संबंधीत अनेक मुद्यावर चर्चा झाली. चर्चेत तत्कालिन संरक्षण मंत्री स्वर्गीय मनोहर परिकर संरक्षण राज्यमंत्री म्हणून मी उपस्थित होतो. चर्चेअंती कराराला अंतिम स्वरुप देण्यात आले. या राफेल खरेदीच्या प्रक्रियेत मी प्रत्यक्ष सहभाग घेतला याचा अभिमान असल्याचेही डॉ. भामरे यांनी सांगितले.

Web Title: The campaign to get me directly involved in the ‘Raphael’ purchase process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.