अलंगुण : नाशिक जिल्ह्यातील अनुदानास पात्र शाळांची फेरतपासणी रद्द करण्याची मागणी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाने माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यातील अनुदानास पात्र शाळांची फेरतपासणी (पुनर्मूल्यांकन ) रद्द करून पहिल्या तपासणीचे पात्र अहवाल अनुदानास ग्राह्य धरावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रमुख मागणीबरोबर शिक्षक व विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात भेडसावणाऱ्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. यात २० टक्के व ४० टक्के अनुदानावरील शाळांना पुढील अनुदानाचा टप्पा तत्काळ देण्यात यावा, अनुदानासाठी अघोषित शाळा घोषित कराव्यात, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचवणे गैरसोयीचे आहे अशा केंद्रातील शाळांची गटशिक्षणाधिकारी यांनी प्रत्यक्ष तपासणी करून शाळेची केंद्रनिर्मितीची मागणी व परिसरातील शाळांची संमती विचारात घेऊन विद्यार्थ्यांना जवळच्या अंतरावरील परीक्षा केंद्र कोणते याचा खात्रीशीर अहवाल माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना तालुका गटशिक्षणाधिकारी यांनी द्यावा, त्यानुसार नवीन दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्राची निर्मिती करण्यासाठी विभागीय शिक्षण मंडळाकडे प्रस्ताव पाठवावेत, वीस टक्के अनुदानावरील शाळांचा सातवा वेतन आयोगाचा पहिला हप्ता देण्यात यावा आदी प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर कार्याध्यक्ष एस.बी. शिरसाठ, सचिव एस.बी. देशमुख, पेठ तालुकाध्यक्ष अनिल देवरे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष भामरे, सुरगाणा तालुका अध्यक्ष अशोक बागुल, उपाध्यक्ष पी.के. चव्हाण, तालुका सचिव पी.के. कापडणीस, पुरुषोत्तम रकिबे, बी.व्ही. पांडे, शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाप्रमुख सोमनाथ धात्रक, शासकीय आश्रमशाळेचे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत जाधव, यू. व्ही. पाटील, डी.जी. आहिरे, एच.एम. गावीत, बी.आर. चव्हाण, दिलीप ह्याळीज, अनिल पाटील, श्रीमती पालीवाल, जगताप, पोर्जे आदींच्या सह्या आहेत.
===Photopath===
031220\03nsk_15_03122020_13.jpg
===Caption===
माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली झनकर- वीर यांना मागणीचे निवेदन देताना नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष एस.बी.शिरसाठ, एस.बी.देशमुख, सुभाष भामरे, अनिल देवरे, अशोक बागुल आदी.०३ अलंगुन १