काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेकडे उमेदवारांची चणचण

By admin | Published: November 12, 2016 09:55 PM2016-11-12T21:55:25+5:302016-11-12T22:11:12+5:30

काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेकडे उमेदवारांची चणचण

Candidates of Congress, NCP, MNS | काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेकडे उमेदवारांची चणचण

काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेकडे उमेदवारांची चणचण

Next

 इंदिरानगर : महापालिका निवडणुकीसाठी झालेली नवीन प्रभागरचना आणि आरक्षण रचनेमुळे पक्षाकडून तिकीट कसे मिळेल, यासाठी इच्छुक उमेदवारांची धडपड सुरू झाली आहे. नवीन प्रभाग २३ आणि ३0 मध्ये भाजप व शिवसेनेकडून इच्छुकांची संख्या जास्त असल्याने बंडखोरीची शक्यता टाळता येत नाही तर मनसे, राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांना उमेदवारासाठी शोधाशोध करावी लागणार आहे.
प्रभाग ३८ चे विद्यमान नगरसेवक सतीश कुलकर्णी, नीलिमा आमले व प्रभाग ४0 चे विद्यमान नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी, यशवंत निकुळे यांचे दोन प्रभाग मिळून नवीन प्रभाग २३ झाला आहे. प्रभाग ४0 मधील कमोदनगर, भारतनगर, शिवाजीवाडी, श्रीरामनगर, विनयनगर, इंदिरानगरचा काही भाग आला आहे. तसेच प्रभाग ३८ मधील डीजीपीनगर, गणेशबाबानगर, सावता माळी रस्ता आदि भाग आला आहे. नवीन प्रभाग २३ ला आरक्षणाने अ विभाग हा अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाला आहे. तसेच ब विभाग हा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी असल्याने कोण बंडखोरी करून पक्ष बदलतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
प्रभाग ५३ चे विद्यमान नगरसेवक सतीश सोनवणे, अर्चना जाधव तर प्रभाग ५४ चे नगरसेवक संजय चव्हाण, रशिदा शेख व प्रभाग ३८ चा वडाळागाव असे तीन प्रभाग मिळून नवीन प्रभाग ३0 झाला आहे. प्रभाग ३८ मधील वडाळागाव आले आहे.
नवीन प्रभाग ३0 चे आरक्षण अ अनुसूचित जातीसाठी असल्याने सर्वच पक्षांना उमेदवाराचा शोध घ्याला लागणार आहे. तर ब नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला तर क भाग सर्वसाधारण महिला व ड हा सर्वसाधारण अशी विभागणी झाल्याने अनेक विद्यमान नगरसेवक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)

Web Title: Candidates of Congress, NCP, MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.