येवला तालुक्‍यातील उमेदवारांचा सोशल मीडियावर प्रचाराचा धुरळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:32 AM2021-01-13T04:32:50+5:302021-01-13T04:32:50+5:30

६१ ग्रामपंचायतींचा प्रचार आता चांगलाच रंगात आला असून गावातील प्रमुख पॅनलच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारही मतदारांपर्यंत आपल्या चिन्हासह पोहोचण्यासाठी ...

Candidates from Yeola taluka are campaigning on social media | येवला तालुक्‍यातील उमेदवारांचा सोशल मीडियावर प्रचाराचा धुरळा

येवला तालुक्‍यातील उमेदवारांचा सोशल मीडियावर प्रचाराचा धुरळा

Next

६१ ग्रामपंचायतींचा प्रचार आता चांगलाच रंगात आला असून गावातील प्रमुख पॅनलच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारही मतदारांपर्यंत आपल्या चिन्हासह पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसत आहेत. त्यासाठी मोबाइलमधील विविध ॲपच्या साहाय्याने निवडक मराठी, हिंदी गाणी टाकून छोट्या-छोट्या व्हिडीओ क्लिप्स तयार करून त्या व्हायरल केल्या जात आहेत. तथापि, मतदारही सोशल मीडियाचा वापर करीत अनेक व्हॉट्सॲप ग्रुपवर गावचा सरपंच कसा असावा यासंदर्भात अनेक विनोदी चुटकुले, निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे निवडणूक संदर्भातील कीर्तन तसेच आदर्श गावचे सरपंच भास्करराव पेरे यांचे समाजप्रबोधनपर व्हिडीओ क्लिप्स टाकून उमेदवारांना ऊर्जा देण्यासोबतच त्यांच्याकडून आपल्या अपेक्षांचा संदेशही पोहोचवीत आहेत.

सध्या ग्रामपंचायत निवडणुकीत सोशल मीडियावरील प्रचारात उमेदवार आपला हात जोडलेला फोटो, निवडणूक चिन्ह, प्रचारपत्रिका तसेच आपल्या नेत्यांचे फोटो वापरून ३० सेकंदाचे व्हिडीओ तयार केले जात आहेत. ‘आमचा नेता लई पाॅवरफुल’, ‘सरपंचपदाचे दावेदार’, ‘फक्त गावाच्या विकासासाठी मत द्या’ आदींसह विविध रिमिक्स गाण्यांचे ऑडिओ, व्हिडीओ क्लिपद्वारे मतदारांना आकर्षित केले जात आहे.

Web Title: Candidates from Yeola taluka are campaigning on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.