गावठी दारू विक्र ीबाबत महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 01:14 AM2019-08-14T01:14:26+5:302019-08-14T01:14:52+5:30
अवैध गावठी दारू विक्रीप्रकरणी बागलाण तालुक्यातील निकवेल येथील शीलाबाई नानाजी अहिरे या महिलेविरुद्ध सटाणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डांगसौदाणे : अवैध गावठी दारू विक्रीप्रकरणी बागलाण तालुक्यातील निकवेल येथील शीलाबाई नानाजी अहिरे या महिलेविरुद्ध सटाणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निकवेल येथील तरुणांनी गावात शंभर टक्के दारूबंदी केली असून, त्यांना ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनी साथ दिली. गावात दारू विक्र ी करताना आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा गावातील तरुणांसह महिला व ग्रामस्थांनी दिला होता.
गावकऱ्यांनी एकत्रित येऊन गावातील अवैध गावठी दारू विक्री बंद केली होती. निकवेल येथील आदिवासी वस्तीतील गावठी दारू
विक्री करणाºयांवर अचानक धाड टाकून सर्व दारू जप्त करून ती नष्ट केली होती. तसेच गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन व साहित्यही या महिलांनी नष्ट केले आहे. तसेच गावातून मोर्चा काढून दारूबंदीच्या घोषणा या रणरागिणींनी दिल्या होत्या. या महिलांबरोबर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गाव व्यवस्थापन समिती अध्यक्ष, तंटामुक्ती समिती अध्यक्ष व ग्रामस्थांनी दारू विक्री करणाºयांना यापुढे गावात दारू विक्री करू नये, अशी तंबी दिली होती. यापुढे दारू विक्री करताना आढळल्यास सदर व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही ग्रामपंचायतीकडून देण्यात आला होता. याप्रकरणी हवालदार प्रकाश जाधव, नाईक जयंतसिंग सोळुंके, राहुल शिरसाठ, निवृत्ती भोये, पंकज सोनवणे आदींनी कारवाई केली.
यावेळी सरपंच चित्राबाई मोरे, उपसरपंच रामचंद्र मोरे, ग्रामपंचायत सदस्य तात्या पांडू , गुलाब मोरे, गाव व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलेश वाघ, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष धर्मेंद्र महाजन, पुंजाराम वाघ, पोलीसपाटील विशाल वाघ, आप्पा सोनवणे, संजय सोनवणे, भिका वाघ, अण्णा वाघ, शांताराम मोरे, रामचंद्र मोरे,देवका माळी, भिकूबाई पिंपळसे, अलकाबाई मोरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
४०० ग्रामस्थांचे पोलिसांना निवेदन
आदिवासी वस्तीतील शीलाबाई नानाजी अहिरे या महिलेकडून अवैधरीत्या गावठी दारू विक्र ी सुरूच होती. समज देऊनही महिला ऐकत नसल्यामुळे सुमारे ४०० गावकºयांनी सटाणा पोलीस स्टेशन गाठून सदर महिलेवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना दिले. यावर पोलीस निरीक्षक देसले यांनी या महिलेस अटक करून गुन्हा दाखल केला आहे.