नाशिक : बेशिस्त वाहनचालकांकडून दंडवसुलीसाठी शहर वाहतूक विभागाने सुरू केलेल्या ई-चलान पद्धतीत सुधारणा करण्यात आली असून, नागरिकांना आता डेबिट, क्रेडिट कार्ड तसेच रोख रक्कम देऊनही दंड भरता येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे़ नोटाबंदीच्या निर्णयानंतर दंडवसुली करताना नागरिक व पोलिसांमध्ये वाद होत असल्याने जून २०१७ मध्ये ई-चलान प्रणाली सुरू केली़ यामध्ये डेबिट व क्रेडिट कार्ड स्वॅप करून दंड भरण्याची सुविधा उपलब्ध होती. परंतु पैसे भरण्यास वाहनधारक उत्सुक नसल्याने या प्रणालीत सुधारणा करून कार्डबरोबरच आता रोख स्वरूपातही दंड भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे़ बेशिस्त वाहनचालकाने ई-चलान प्रणाली कार्डद्वारे अथवा रोख स्वरूपात दंडाचा भरणा करताच त्याने दिलेल्या मोबाइल नंबरवर त्यास रक्कम भरणा झाल्याचा संदेश मिळणार आहे. तसेच दिलेल्या लिंकवर गेल्यास ई-चलानची पावती संबंधित वाहनधारकास डाउनलोड करून त्यांची प्रिंट काढता येणार आहे़ या प्रणालीमुळे वाहनचालकाचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे, या प्रणालीची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल झाल्यामुळे वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहन-चालकांची माहिती डिजिटल स्वरूपात पोलीस प्रशासनास उपलब्ध होणार आहे. या माहितीमुळे वारंवार नियम मोडणाºया चालकांवर परवाने निलंबनाची कारवाई करणे शक्य होणार असून, हा डाटा प्रादेशिक परिवहन विभागाशी जोडून वाहनधारकाचे नाव व पत्ता आपोआप मिळणे शक्य होणार आहे.ई-चलान पध्दतीत सुधारणाबेशिस्त वाहनचालकांकडून दंडवसुलीसाठी शहर वाहतूक विभागाने सुरू केलेल्या ई-चलान पद्धतीत सुधारणा.डेबिट, क्रेडिट कार्ड तसेच रोख रक्कम देऊनची दंड भरता येणार. प्रणालीत सुधारणा करून कार्डबरोबरच आता रोख स्वरूपातही दंड भरण्याची सुविधा उपलब्ध. दंडाचा भरणा करताच त्याने दिलेल्या मोबाइल नंबरवर त्यास रक्कम भरणा झाल्याचा संदेश मिळणार.
ई-चलानमध्ये रोख दंड भरण्याची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 12:22 AM