जात प्रमाणपत्र पडताळणी समितीवर प्रश्नांचा भडीमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:15 AM2021-04-20T04:15:23+5:302021-04-20T04:15:23+5:30
चौकट - आठवड्यातून एकदा वेबिनार घ्यावे जात पडताळणी समितीने सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य असून, कोविडच्या काळात नागरिकांना कार्यालयापर्यंत ...
चौकट -
आठवड्यातून एकदा वेबिनार घ्यावे
जात पडताळणी समितीने सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य असून, कोविडच्या काळात नागरिकांना कार्यालयापर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. यासाठी समितीने दर आठवड्यातून एक दिवस असे वेबिनार घेऊन प्रकरणांचा प्रवास कुठपर्यंत आला आहे, याची माहिती नागरिकांना द्यावी, अशी मागणी यावेळी अनेक नागरिकांनी केली.
चौकट -
शपथपत्राची मूळ प्रत अपलोड करा
जात पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज भरताना जोडण्यात येणाऱ्या शपथपत्राची मूळ प्रत अपलोड करावी. अनेक नागरिक त्याची झेरॉक्स प्रत अपलोड करीत असल्यामुळे त्यात क्युरी निघतात. त्याचबरोबर वंशावळ लिहिली आणि सदर व्यक्तीचा अर्जदाराशी असलेला नातेसंबंध याचे पुरावे देणेही आवश्यक आहे. अनेक नागरिक वंशावळ लिहितात, पण पुरावे देत नाहीत. अशा प्रकरणांची पडताळणी करताना अडचणी येतात, असे माधव वाघ यांनी यावेळी सांगितले.
चौकट -
जात पडताळणी समिती कार्यालयाने दिलेल्या टोल फ्री नंबरवर वारंवार फोन करूनही तो लागत नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली. नागरिकांच्या सोयीसाठी लवकरच दूरध्वनी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
चौकट -
१९३८ चा पुरावा जोडला तरी प्रकरण प्रलंबित
मी प्रकरण सादर करून अनेक महिने झाले आहेत, पुरावा म्हणून १९३८ चे प्रमाणपत्र जोडलेले आहे, तरी अद्याप प्रकरण प्रलंबित आहे, अशी तक्रार एका नागरिकाने केली. तर जात पडताळणी झालेल्या तीन सख्ख्या चुलतभावांचे पुरावे जोडले आहेत, तरी माझे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे, अशी तक्रारही एका नागरिकाने वेबिनारमध्ये केली.