बैलगाडी शर्यतीवरील बंदीमुळे गोवंश संगोपन धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 12:00 AM2021-08-19T00:00:25+5:302021-08-19T00:19:43+5:30

मानोरी : महाराष्ट्रात बंद असलेली बैलगाडी शर्यत चालू करण्यात यावी, खिलार गोवंश वाचविण्यात यावे, शेतकऱ्यांची उन्नती करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मागण्या मान्य करण्यात याव्यात, यासह इतर मागण्यांसाठी येवला तालुक्याचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, माजी पंचायत समिती सभापती संभाजीराजे पवार यांच्या नेतृत्वाखाली येवला तालुक्यातील शेतकरी व बैलगाडी चालक-मालक यांनी तहसीलदार प्रमोद हिले, तालुका पोलीस निरीक्षक कोळी साहेब यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ह्यबैल वाचवा, संस्कृती टिकवाह्ण तसेच ह्यपेटा हटवा, बैल वाचवाह्ण, अशा प्रकारच्या मागण्या निवेदनात केल्या आहेत.

Cattle rearing in danger due to ban on bullock cart race | बैलगाडी शर्यतीवरील बंदीमुळे गोवंश संगोपन धोक्यात

बैलगाडी शर्यत चालू करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार प्रमोद हिले यांना देताना माणिकराव शिंदे, संभाजी पवार, समवेत उपस्थित शेतकरी.

Next
ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : शर्यत पुन्हा सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी

मानोरी : महाराष्ट्रात बंद असलेली बैलगाडी शर्यत चालू करण्यात यावी, खिलार गोवंश वाचविण्यात यावे, शेतकऱ्यांची उन्नती करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मागण्या मान्य करण्यात याव्यात, यासह इतर मागण्यांसाठी येवला तालुक्याचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, माजी पंचायत समिती सभापती संभाजीराजे पवार यांच्या नेतृत्वाखाली येवला तालुक्यातील शेतकरी व बैलगाडी चालक-मालक यांनी तहसीलदार प्रमोद हिले, तालुका पोलीस निरीक्षक कोळी साहेब यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ह्यबैल वाचवा, संस्कृती टिकवाह्ण तसेच ह्यपेटा हटवा, बैल वाचवाह्ण, अशा प्रकारच्या मागण्या निवेदनात केल्या आहेत.

महाराष्ट्रातील शेतकरी घराण्याची परंपरा जपणारा बैलगाडी शर्यत हा मराठी संस्कृतीचा पारंपरिक मर्दानी खेळ. महाराष्ट्रातील असंख्य गावातील ग्रामदेवतेच्या यात्रेमध्ये या शर्यतींचे आयोजन केले जाते. धार्मिक व सांस्कृतिक परंपरांची जपवणूक या खेळाद्वारे केली जाऊन या पारंपरिक खेळातून देशी गायी-बैलांचे संगोपनही केले जाते. या पारंपरिक खेळाच्या अस्तित्वामुळेच देशी गोवंशांची वाढ होते. याच खेळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कारागीर, सामान्य शेतकऱ्यांना वाहतूक व्यवस्थेसह चांगल्या स्वरूपात आर्थिक पाठबळ मिळते. परंतु, आज या खेळास बंदी आल्यामुळे गोवंशांची वाढही धोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर देशाची व महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती यांचे संरक्षण करणे, जतन करणे हा सर्वसामान्य नागरिकांना संविधानाने दिलेला अधिकार आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी तालुक्याचे मुरलीधर सोनवणे, संजय वारुळे, सौरभ गायकवाड, रवी बोरणारे, नीलेश कातुरे, रामदास इंगळे, राजू शिंदे, राजू गुरू, धनराज पालवे, दत्ता जाधव, गणेश बोळीज, विष्णू पवार, संतोष लभडे, गोरख चव्हाण, कचरू गाढे, जालिंदर गायकवाड, डेंगळे, सागर जांभळे, अजय महाले, किरण पवार, लक्ष्मण आहेर आदींसह तालुक्यातील विविध गावांतील बैलगाडी शर्यतप्रेमी शेतकरी उपस्थित होते.

खिलार गोवंश धोक्यात
संपूर्ण जगाला पशुधनामध्ये महाराष्ट्राची ओळख निर्माण करून देणारा व महाराष्ट्राचे पांढरे सोने म्हणून प्रसिद्ध असलेला ह्यखिलारह्ण हा देशी गोवंश असून, आयुर्वेद शास्त्रात त्याचे खूप महत्त्व आहे. बैलगाडी शर्यत बंदीमुळे अशा खिलार देशी गाय-बैल यांच्या वंशाचे संगोपन धोक्यात आले आहे. महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यत सुरु करावी, खिलार गोवंश वाचविणे, शेतकऱ्यांची उन्नती करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मागण्या निवेदनात केल्या आहेत.
 
Web Title: Cattle rearing in danger due to ban on bullock cart race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.