नाशिक : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता कोणतीच आरोेग्य व्यवस्था त्याला पुरी पडू शकणार नसल्याचे सध्या तरी दिसत आहे. अशा परिस्थितीत कोरोना होऊच नये, यासाठी दक्षता घेण्याची नितांत गरज आहे. तसेच यदाकदाचित तापासह अन्य कोणतीही लक्षणे आढळल्यास घरच्या घरी प्रयोग करीत न बसता त्वरीत डॉक्टरांकडून उपचार करुन घेण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे.
कोरोनाच्या प्रारंभापासून सांगण्यात येत असलेली दक्षता सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्स हेच सर्वाधिक प्रभावी सुत्र आहे. त्यातही योग्य मास्कचा वापर सर्वाधिक महत्वाचा आहे. तसेच कुणाशीही बोलताना किंवा आपल्या आसपास व्यक्ती असताना तर मास्क बंधनकारकच मानणे आवश्यक आहे. तसेच किमान दर तास- दोन तासाला हात धुत राहणेदेखील नितांत आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्ती हा कोरोनाच्या कचाट्यात येऊ शकतो. या दुसऱ्या लाटेत त्याला वयाचे कोणतेही बंधन उरलेले नाही. त्यामुळे आपल्याला कोरोना होऊच शकणार नाही, मी खूप तंदुरुस्त आहे, अशा भ्रमात कुणीही राहू नये.
इन्फो
नवीन लाटेत ताप केवळ एकच दिवस येत असल्याने तत्काळ आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधून खातरजमा करुन घेण्यास प्राधान्य द्यावे.
माझ्यासमवेत कार्यालयात दोनच मित्र, सहकारी असल्याने काहीच समस्या नाही हा भ्रमदेखील मनातून काढून टाकणे.
केवळ आणि केवळ अत्यावश्यक, जीवनावश्यक काम असेल तरच कोणत्याही नागरिकाने घराबाहेर पडावे. अन्यथा घराबाहेर न पडणे हाच कोरोनापासून दूर राहण्याचा उपाय आहे.
बाहेरुन घरी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने घरात जाताच कपडे धुवायला टाकून स्नान करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच दिवसातून दोन वेळा वाफ घेतल्यासही मदत होते.
डाॅ. ज्ञानेश्वर थोरात
------
फोटो
१४डॉ. थोरात