सावधान... धरण पर्यटनाला सध्या बिबटे निघाले आहेत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:10 AM2021-06-30T04:10:44+5:302021-06-30T04:10:44+5:30
नाशिक शहराच्या आजूबाजूला मनपा हद्दीला लागून असलेल्या शहराजवळच्या खेड्यांमध्ये बिबट्यांचा अधिवास चांगल्याप्रकारे असल्याचे वनविभागाकडून अनेकदा स्पष्ट केले गेले आहे. ...
नाशिक शहराच्या आजूबाजूला मनपा हद्दीला लागून असलेल्या शहराजवळच्या खेड्यांमध्ये बिबट्यांचा अधिवास चांगल्याप्रकारे असल्याचे वनविभागाकडून अनेकदा स्पष्ट केले गेले आहे. गोवर्धन गावाच्याजवळ गंगापूर धरणाला लागून असलेल्या पश्चिम वनविभागाच्या शासकीय रोपवाटिकेच्या परिसरात बिबटे भटकंती करताना काही पर्यटकांच्या नजरेस दोन दिवसांपूर्वी पडल्याच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओला वनविभागाकडून दुजोरा देण्यात आला आहे. व्हिडिओची दखल घेत वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी पथकाला घटनास्थळी पाठवून शोधमोहीम घेण्याचे आदेश दिले होते. वनकर्मचाऱ्यांनी या परिसरात गस्त केली असता बिबट्याच्या वेगवेगळ्या आकाराचे पायांचे ठसे आढळून आले. बिबट्याच्या संचाराच्या पाऊलखुणा तपासत वनकर्मचाऱ्यांनी या भागात मध्यम वयाचे प्राैढ तीन बिबटे भटकंती करत असल्याचा कयास लगावला आहे. दरम्यान, गंगापुर धरणाच्या परिसरात दाट झाडी, पाण्याची मुबलकता, रानडुकरांचा वावर असल्यामुळे बिबट्यांचा या भागात संचार आढळून येतो, असे भदाणे म्हणाले.
--इन्फो--
धरणाचा भाग बिबट्यांचा ‘कॉरिडोर’
गंगापूर धरणाचा परिसर थेट सावरगावापासून तर महादेवपूरपर्यंत बिबट्याच्या अधिवासाचे क्षेत्र आहे. तेथून डावा कालवा मखमलाबादकडे जातो. हा भाग बिबट्याच्या संचाराचा कॉरिडोर असून या परिसरात पर्यटकांनी जाणे टाळावे, जेणेकरून स्वत:ची सुरक्षितता धोक्यात येणार नाही, असे आवाहन उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी केले आहे. या भागातील स्थानिक नागरिकांनीसुध्दा सावधगिरी बाळगून आपले पशुधन व लहान मुलांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नये, असेही ते म्हणाले.
===Photopath===
290621\29nsk_28_29062021_13.jpg~290621\29nsk_29_29062021_13.jpg
===Caption===
गंगापूर धरण परिसरात बिबट्याचे दर्शन~गंगापूर धरण परिसरात बिबट्याचे दर्शन