आॅक्सिजनसह बेडस् उपलब्धतेबाबत दक्षता आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 12:04 AM2020-09-26T00:04:06+5:302020-09-26T00:45:28+5:30
नाशिक: रुग्णसंख्या मध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घट होत असली तरीदेखील भविष्यातील संभाव्य वाढ विचारात घेता आॅक्सिजन, बेड्स आणि औषधांची कमतरता निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात यावी अशा सुचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
नाशिक: रुग्णसंख्या मध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घट होत असली तरीदेखील भविष्यातील संभाव्य वाढ विचारात घेता आॅक्सिजन, बेड्स आणि औषधांची कमतरता निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात यावी अशा सुचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्याची आढावा बैठक अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात झालेल्या या बैठकीत पालकमंत्र्यांनी कोरोना कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर,आमदार माणिकराव कोकाटे, सरोज आहिरे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य सिमांतीनी कोकाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
पालमंत्री भुजबळ म्हणाले की, जिल्'ात उपलब्ध असलेली रेमडिसिव्हरची इंजेक्शन रूग्णांना वेळेत व वाजवी दराने मिळतील याची दक्षता घेतली जाणे अपेक्षित आहे. रेमडिसिव्हर चा पुरवठा सुरळीत करण्याबरोबरच त्याचा किती साठा उपलब्ध आहे याबाबत प्रत्येक रुग्णालयाबाहेर फलक लावण्यात यावा. जास्तीत जास्त रेमडिसिव्हरचा साठा शासकीय रुग्णालया च्या औषध विक्री केंद्रामार्फत उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मुंबईतील केईएमच्या धर्तीवर नाशिक मध्ये सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी अद्यावत महापलिकेमार्फत रुग्णालय तयार करण्यास प्राधान्य देण्यात यावे. आॅक्सिजन टँक लवकरात लवकर बसविण्यात यावेत याबाबत नियोजन करण्याचे आदेश त्यांनी अधिकाºयांना दिले. येवला उपजिल्हा रुग्णालयात तातडीने सर्व सुविधा व व्यवस्था पूर्ण करण्यात याव्यात अशा सुचना त्यांनी दिल्या.
यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार सरोज आहेर आदींनी सहभाग घेतला. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्'ातील एकंदरीत व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील माहिती सादर केली.
--इन्फो--
जिल्'ातील रूग्णसंख्या घटली
जिल्'ात ६८८२९ कोरोनाग्रस्त त्यातील ८८ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. १०८१८ वरून ३ हजाराने जिल्'ात रुग्णसंख्या घटली आहे. देशात आणि राज्यातील मृत्यूदरा पैकी नाशिक जिल्'ात सर्वात कमी मृत्युदर आहे. शून्य मृत्युदर करण्यासाठी प्रशासन काम करत आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण सर्वाधिक आहे. आॅक्सिजनच्या उपलब्धतेबाबत देखील प्रशासनाने गेल्या पंधरा दिवसात प्रयत्नपूर्वक नवीन क्षमता निर्माण केली आहे व सध्या आॅक्सिजनचा तुटवडा भासा नसल्याचा दावा भुजबळ यांनी यावेळी केला.
--इन्फो--
औषध उपलब्धते बाबत प्रचार प्रसार करण्यास प्राधान्य देण्यात यावार तसेच प्रत्येक रुग्णालयाबाहेर बेड्स आणि औषध साठ्याबाबत बोर्ड लावण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी. मेडिक्लेमच्या बाबतीत येणाºया अडचणी राज्यस्तरावर नेण्यात येऊन सोडविण्यात येतील, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
(फोटो ल्ल२‘ किंवा राजू ठाकरे)