अंबोलीत बालिका दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:44 AM2021-01-08T04:44:23+5:302021-01-08T04:44:23+5:30
अंबोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय ‘सन्मान सावित्रीच्या लेकींचा’ हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी आर.व्ही. शिरसाठ, ...
अंबोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय ‘सन्मान सावित्रीच्या लेकींचा’ हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी गटशिक्षणाधिकारी आर.व्ही. शिरसाठ, सरपंच चंद्रभागा लचके, भास्कर मेढे, जयश्री पाटील (हिरे), सरला मोरे उपस्थित होते. यावेळी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल सर्व सवित्रीच्या लेकी-महिला शिक्षिका व विद्यार्थिनी प्रतिनिधी यांचा फेटा, सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
--------------
वेळुंजेत कार्यक्रम
वेळुंजे : येथील कार्यक्रमात अंगणवाडी सेविका व विद्यार्थिनी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. विद्यार्थिंनी पुष्पहार अर्पण करून ‘सावित्रीची ओवी’ गायन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य प्रवर्तन काशीद यांनी बालिका दिनाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमास विजय पुराणे, सरपंच नानासाहेब उघडे, नामदेव उघडे, भाऊसाहेब काशिद, खोटरे, ठोके, सोनवणे उपस्थित होते.
---------------
पँथर सेनेतर्फे अभिवादन
येवला : ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. म.फुले नाट्यगृह आवारात झालेल्या कार्यक्रमास पँथर सेनेचे अध्यक्ष करण संसारे, विनोद त्रिभुवन, गौरव संसारे, राजू बच्छाव, साईनाथ भालेराव, आकाश कोपरे, प्रवीण गरूड, संतोष मोरे, प्रदीप पगारे आदी उपस्थित होते. (०४ येवला २)
-------------------
येवला महाविद्यालय
येवला : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचलित, कला व वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन तथा महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ.भाऊसाहेब गमे यांचे हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने ‘सावित्रीबाई फुले शिक्षण आणि कार्य’ या विषयावर वैद्यकरत्न पुरस्कारप्राप्त डॉ. सुरेश कांबळे यांच्या ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
-------------------------
सुकेणेला कार्यक्रम
कसबे सुकेणे : येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली. प्रतिमापूजन करून सावित्रीबाईंना अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अश्विनी मोगल, अनुपमा जाधव, कल्पना भंडारे, छाया काठे, आरती तिडके, जनार्दन जाधव यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी विचार मांडले. सुकेणे व परिसरातील उच्चशिक्षित शीतल वाघ, सोनाली पवार, माधुरी नन्नवरे, श्वेता बकरे, गायत्री भंडारे पूजा धोबाडे, सरला पवार, माया पारधे, वृषाली राहणे, श्रद्धा राहणे या सावित्रीच्या लेकींचा सत्कार अश्विनी मोगरा यांच्या हस्ते करण्यात आला व महिला कोविड योद्धांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
----------------------
सई स्कूल, नगरसूल
नगरसूल : सई ग्रीन इंग्लिश मीडिअम स्कूल येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.