मालेगावी घरोघरी नमाज अदा करून बकरी ईद साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 11:15 PM2020-08-01T23:15:50+5:302020-08-02T01:28:21+5:30
मालेगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शनिवारी मुस्लीम बांधवांनी घरोघरी बकरी ईदचे नमाजपठण केले. परवानगी असलेल्या जनावरांची घराजवळच कुर्बानी देऊन पारंपरिक पद्धतीने ईद साजरी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शनिवारी मुस्लीम बांधवांनी घरोघरी बकरी ईदचे नमाजपठण केले. परवानगी असलेल्या जनावरांची घराजवळच कुर्बानी देऊन पारंपरिक पद्धतीने ईद साजरी करण्यात आली.
येथील पोलीस कवायत मैदानावरील इदगाहजवळ दरवर्षी नमाजपठणासाठी होणारी गर्दी यंदा दिसली नाही. पोलिसांनी इदगाहकडे जाणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी केली होती. एकात्मता चौक, कॉलेजरोड येथे संरक्षक जाळ्या लावण्यात आल्या होत्या. वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती.
पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. बकरी ईदच्या अनुषंगाने राज्य शासनाने काही मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. या सूचनांचे जनतेने पालन करून घरातच नमाज व दुआपठण केले. परवानगी असलेल्या जनावरांची घरासमोरच कुर्बानी देण्यात आली. स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या चार तुकड्या शहरात तैनात होत्या. शहरात बकरी ईद सलग तीन दिवस साजरी केली जाते. या काळात जनावरांची कुर्बानी दिली जाते. या तीन दिवसांव्यतिरिक्त पुढील आठवडाभर स्वच्छतेचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे.