अंदरसूल परिसरात स्वातंत्र्यदिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 05:40 PM2020-08-17T17:40:51+5:302020-08-17T17:41:15+5:30

अंदरसूल : परिसरात विविध संस्था, शाळा व शासकीय कार्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Celebrate Independence Day in Andarsul area | अंदरसूल परिसरात स्वातंत्र्यदिन साजरा

अंदरसूल परिसरात स्वातंत्र्यदिन साजरा

googlenewsNext
ठळक मुद्देमातोश्री विठाबाई चव्हाण वियालय

अंदरसूल : परिसरात विविध संस्था, शाळा व शासकीय कार्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
ग्रामपालिकेत तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुनील देशमुख यांच्या हस्ते, जिल्हापरिषद प्राथमिक शाळा (मुले) येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांच्या हस्ते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुली) येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष चैताली गायकवाड यांच्या हस्ते,
प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद तारु , लक्ष्मी महिला नागरी पंतसंस्थेत चेअरमन मंदाकिनी किसनराव धनगे व व्हा. चेअरमन प्रमिला देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संचालिका मंगला प्रकाश साबरे, प्रतिभा देशमुख, संगीता देशमुख, व्यवस्थापक मनोहर शेळके आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

राधिका इंग्लिश मीडियम स्कूल
अंदरसूल येथील राधिका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संस्था सचिव कुणाल धुमाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या पाशर््वभूमीवर स्वातंत्र्यदिना निमित्ताने यावर्षी शाळेतर्फेविद्यार्थ्यांसाठी डीजीटल पद्धतीने विविध उपक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. राजश्री गोसावी, आकाश खरास यांनी सूत्रसंचालन केले. वर्षा मते, अपर्णा पाटील यांनी आभार मानले. कार्यक्र माचे संयोजन वासंती खिरड, निर्मला शिकारे, दुर्गा परदेशी, सत्यजित पाटील, नासीर शेख यांनी केले होते. कार्यक्र मास प्राचार्या पलक धुमाळ, उपप्राचार्य शादाब शेख, सायली गाडीवान, पूजा झाल्टे आदी उपस्थित होते.

मातोश्री विठाबाई चव्हाण वियालय
अंदरसूल येथील मातोश्री विठाबाई चव्हाण विद्यालयात मुख्याध्यापक नानासाहेब पटाईत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी पर्यवेक्षक बापूसाहेब मोरे, राजेंद्र पवार, शरद पुंड आदी उपस्थित होते.
 

Web Title: Celebrate Independence Day in Andarsul area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.