लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही हक्काचा पुरावा असलेल्या शिधापत्रिकेपासून दूर राहिलेल्या पेठ तालुक्यातील वंचित घटकातील नागरिकांना प्रथमच शिधाापत्रिक प्रााप्त झाल्याने ग्रामस्थांनी वाजत गाजत मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला.शासन दरबारी विविध शासकिय योजना, सवलती, शिक्षण व शासकिय धान्य प्राप्तीसाठी शिधा पत्रिका हा महत्वाचा पुरावा समजला जातो, मात्र पेठ तालुक्यातील विशिष्ट समाज वर्षानुवर्ष या शासकिय योजनांपासून वंचित राहीला होता.कागदपत्रांची अपूर्तता व अन्य कारणामूळे प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने पेठ तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले होते. प्रशासनाने संघटनेच्या आंदोलनाची दखल घेऊन अर्ज व कागदपत्रांची पडताळणी करून पाहिल्या टप्प्यातील ३२ कुटंूबांना शिधा पत्रिका वाटप करण्यात आले.प्रथमच अशा प्रकारचा स्थायी शासकीय पुरावा मिळाल्याने ग्रामस्थांनी पावरी नृत्यावर गावातून मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला.
... शिधा पत्रिकांची मिरवणूक काढून आनंद साजरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 2:49 PM
पेठ : स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही हक्काचा पुरावा असलेल्या शिधापत्रिकेपासून दूर राहिलेल्या पेठ तालुक्यातील वंचित घटकातील नागरिकांना प्रथमच शिधाापत्रिक प्रााप्त झाल्याने ग्रामस्थांनी वाजत गाजत मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला.
ठळक मुद्देश्रमजीवी संघटना : पेठ तालुक्यातील वंचित घटकांना प्रथमच मिळाले रेशनकार्ड