शतकुंडीय हवनात्मक लक्षचंडी महायज्ञास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 10:42 PM2018-02-18T22:42:12+5:302018-02-18T22:47:59+5:30
त्र्यंबकेश्वर : श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे तयार असलेल्या अन्नपूर्णामाता मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी येथे शतकुंडीय हवनात्मक लक्षचंडी महायज्ञास रविवारपासून प्रारंभ झाला. यानिमित्ताने गावातून शोभायात्रा काढण्यात आली होती. आश्रमापासून निघालेली शोभायात्रा संत निवृत्तिनाथ रोड, तेली गल्ली, भगवती चौक, बोहोरपट्टी, लक्ष्मीनारायण चौकमार्गे मेनरोडने कुशावर्तावर नेऊन धार्मिक पूजाविधी पार पाडून शोभायात्रा पुनश्च आश्रमात आणण्यात आली. यावेळी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंदगिरीजी यांचे सुवासिनींनी औक्षण केले.

घोडेस्वार, भगवे ध्वज घेउन चालणारे भाविक, त्यांच्यामागे ऊस घेऊन चालणाºया भाविकांच्या झुंडी, त्यांच्या मागे डोक्यावर कलश घेउन चालणाºया महिला आणि त्यानंतर महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंदगिरीजी यांचा रथ, त्यांच्या मागे महात्मा बसलेले दोन रथ आणि शेवटी भाविक अशी लांबच लांब मिरवणूक संपन्न झाली. यावेळी तीन बँण्ड पथक व दक्षिण भारतातील कलाकरांचा वाद्यवृंद असा सर्व मिरवणुकीचा सोहळा होता. रस्त्यावर जागोजागी नक्षीकोरलेल्या रंगीत रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या.
अन्नपूर्णामातेचे सुंदर आणि विलोभनीय संगमरवरी पाषाणाचे मंदिर साकारले आहे. या मंदिराची संकल्पना ब्रह्मलीन महामंडलेश्वर स्वामी प्रभानंदगिरीजी यांची होती. आणि आता त्यांचेच शिष्य विद्यमान संस्थापक श्री श्री महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंदगिरीजी सिद्धपीठाधिश्वर यांच्या पुढाकाराने अन्नपूर्णा आश्रम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अन्नपूर्णामातेचे मंदिर उभारण्यात आले आहे.
या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या बुधवारी (दि. २१) होत आहे. तथापि, या सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या लक्षचंडी महायज्ञाचा रविवारी पहिला दिवस असल्याने शोभायात्रा काढण्यात आली होती.मॉँ अन्नपूर्णा देवी आणि महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराजाच्या सान्निध्यात मायेच्या कृपाशीर्वादाने प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. भारताची अखंडता, संप्रभुता, सामाजिक एकता, विश्वशांती, जनकल्याण यासाठी या यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.