सप्तश्रृंगगडावरील चैत्रोत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:21 PM2020-03-16T12:21:02+5:302020-03-16T12:21:10+5:30
कळवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या २ एप्रिलपासून सप्तशृंगगडावर सुरू होणाऱ्या चैत्रोत्सव रद्द करण्याची माहिती माहिती बैठकीत देण्यात आली.
कळवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या २ एप्रिलपासून सप्तशृंगगडावर सुरू होणाऱ्या चैत्रोत्सव रद्द करण्याची माहिती माहिती बैठकीत देण्यात आली.
चैत्रोत्सवाच्या नियोजनाबाबतची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सहायक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस, आरोग्य आदी विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत कोरोनाबाबत सविस्तर चर्चा झाली. सप्तशृंगगडावर सद्यस्थितीत कोरोनाचे सावट दिसत नसले तरी चैत्रोत्सवावर त्याचा परिणाम होऊ नये, याची खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात आली असून, ठिकठिकाणी माहिती फलक लावून भाविकांनी घ्यावयाच्या काळजीबाबत फलक लावले आहेत. दर्शनासाठी भक्त व पर्यटकांची गर्दी असते.
अद्यापतरी गडावरील भाविकांच्या संख्येत कुठलाही फरक पडलेला नाही. सप्तशृंगी देवी ट्रस्ट प्रशासनाने कर्मचारी व ग्रामस्थांना आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. ज्यांना सर्दी, खोकला असेल अशांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, मास्क व जंतूनाशक औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यांना सर्दी-खोकला आहे त्यांना मास्क लावण्यास सांगण्यात आले आहे. पिण्याच्या शुद्ध पाण्याबाबत ट्रस्ट व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे काळजी घेत असून, दोन ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे.