येवला : तालुक्यातील पूरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकूलातील विध्यार्थी चंदना सातपुते हिची भारत सरकारच्या भारतीय खेळ प्राधिकरण औरगाबाद येथे होणाऱ्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.चंदना ने खेलो इंडिया सारख्या पहिल्या निवड चाचणीत ती तीन राज्यात पहिली होती. पुढील दुसरी चाचणी हरियाणा (रोहतक) या ठिकाणी १० दिवस चालली या निवड चाचणीत तिला थोडक्यावरून अपयश आले. त्यानंतरही नियमित सराव सुरूच ठेवला व दिनाक १३ व १४ आॅगस्ट दरम्यान ‘र्स्पोटस् अॅथोरिटी आॅफ इंडिया’ हि निवड चाचणीत तिची निवड झाली आहे. यात तिला आंतराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण, साहित्य, खेळाडूला आवश्यक असलेले संतुलीत आहार, शिष्यवत्ती या सारख्या सुविधा भारत सरकार अंतर्गत तिला मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या राज्यस्तरिय स्पर्धेत चंदनाला कास्य पदक मिळाले. पुढील महिन्यात छत्तीसगड येथे होणाºया राष्ट्रीय स्पर्धेत चंदना महाराष्टाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.चंदना विनायक सातपुते हि आठवीत शिकत असून तीने २ वर्षापासून तलवारबाजीचा सराव क्र ीडा प्रशिक्षक अमोल आहेर याच्या मार्गदर्शनाखाली गुरु कुलात सुरु केला. चंदनाने आतापर्यत १० जिल्हा स्पर्धा, ४ विभाग स्पर्धा, ७ ते ८ शालेय तसेच असोसिएशन राज्य स्पर्धेत सुवर्ण, रौप्य, कास्य आश्या वेगवेगळ्या पदकांची कमाई केली आहे.चंदना सातपुते हिचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे, संत सेवादास महाराज, उपाध्यक्ष रामभाऊ झांबरे, प्राचार्य राजेश पाटील व योगेश सोनवणे, संकुल प्रमुख प्रकाश भांबरे, प्रमोद शेलार, तेजस राऊत, क्र ीडा शिक्षक प्रवीण घोगरे,योगेश गागुर्डे ,ऋतिक भाबड यांनी अभिनंदन केले आहे.
भारतीय खेळ प्रशिक्षणासाठी चंदना सातपुते हिची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 7:20 PM
येवला : तालुक्यातील पूरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकूलातील विध्यार्थी चंदना सातपुते हिची भारत सरकारच्या भारतीय खेळ प्राधिकरण औरगाबाद येथे होणाऱ्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.
ठळक मुद्देछत्तीसगड येथे होणाºया राष्ट्रीय स्पर्धेत चंदना महाराष्टाचे प्रतिनिधीत्व करणार