लोकसहभागाने चांदवडला पुरस्कार
By admin | Published: April 21, 2017 01:05 AM2017-04-21T01:05:38+5:302017-04-21T01:05:57+5:30
चांदवड : तालुक्याला जलयुक्त शिवार योजनेंतर्गतचे राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे परितोषिक लोकसहभागाचे चीज असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी काढले
चांदवड : तालुक्याला जलयुक्त शिवार योजनेंतर्गतचे राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे परितोषिक लोकसहभागाचे चीज असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी काढले. शिरुर येथे जलयुक्त शिवारच्या १५ गावांचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
जनतेने कामे चांगली व दर्जेदार करून घ्यावीत. तलाव, पाझरतलाव, बंधारे यांच्यातील गाळ काढल्यास पाणी साठवण क्षमता वाढल्यानेच चांदवड तालुक्यात एप्रिलपर्यंत पाणी टिकले. टॅँकरमुक्ती झाली आहे. शिरुरसारख्या छोट्याशा गावाने जर मागेल त्याला शेततळे या योजने भाग घेतला, शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्यास त्यांना शेततळ्यासाठी जेसीबी व इतर खर्चासाठी २० टक्क्यांपर्यंत आगाऊ रक्कम दिली जाईल, असे जागेवरच आदेश देऊन या गावात पूर्वी १९ शेततळे मंजूर झाली अजून २५ शेततळे लगेच देऊ, असे जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी सांगितले.
या शेततळ्यात कागद टाकण्यासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च येतो. त्यासाठी जागेवरच प्लॅस्टिक कागदासाठी कर्जपुरवठा केला जाईल. या शेतकऱ्यांना विनाव्याजी हे कर्जपुरवठा जिल्हा विकास योजनेमार्फत पुरवू असे जाहीर करून या भागातील ३०० विहिरीपैकी १०० विहिरीचे पुनर्भरणाचे काम करावे. त्यांनाही महाराष्ट्र रोजगार हमी कार्यक्रमातून अनुदान दिले जाईल. त्यासाठी त्या शेतकऱ्यांकडे जॉब कार्ड व बॅँकेचे पासबुक असावे. त्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी मदत करावी, असे जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी जाहीर केले.
व्यासपीठावर कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक तुकाराम जगताप, जिल्हा कृषी अधिकारी कानोडे, आर्ट आॅफ लिव्हिंगचे जिल्हा समन्वयक विजय हाके, प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार डॉ. शरद मंडलिक, जिल्हा परिषद सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, कविता धाकराव, डॉ. सयाजीरावगायकवाड, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील शेलार, पंचायत समिती सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, अशोक भोसले, गटविकास अधिकारी पुष्पा पांडे, सरपंच अलका जाधव, उपसरपंच शिवाजी जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन कृषी अधिकारी विजय पवार यांनी केले, तर प्रास्ताविक प्रांताधिकारी भीमराज दराडे, आभार तहसीलदार डॉ. शरद मंडलिक यांनी मानले. यावेळी सरपंच अलका गांगुर्डे, मधुकर जाधव, नंदू जोंधळे यांनी गावाच्या समस्या मांडल्या. कार्यक्रमास आर्ट
आॅफ लिव्हिंगचे अशोक गवळी, संजय खैरनार, अनिस म्हसराणी, विकास भुजार्डे, मनोज शिंदे, बाळासाहेब ठाकरे, नंदू जोंधळे, राहुल जाधव, देवीदास अहेर, के.बी. जंगम, चांदवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, वर्धमान पांडे, संजय गुरव, नितीन फंगाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, वनविभागाचे सोनवणे, बी. पी. खंगरे, अॅड. पवनकुमार जाधव, नंदू जोधंळे, शिवाजी जाधव, आदिंसह ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)