चांदोरीत ‘देव द्या, देव पण घ्या’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 05:12 PM2020-09-02T17:12:32+5:302020-09-02T17:19:29+5:30
चांदोरी : गोदावरी काठी सामाजिक अंतर राखत व पर्यावरण पूरक गणेश विसर्जन पार पडले. ‘देव द्या देवपण घ्या’ या उपक्र माला ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत १०० टक्के मूर्ती दान केल्या.
चांदोरी : गोदावरी काठी सामाजिक अंतर राखत व पर्यावरण पूरक गणेश विसर्जन पार पडले. ‘देव द्या देवपण घ्या’ या उपक्र माला ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत १०० टक्के मूर्ती दान केल्या.
नद्या ,ओहळ ,बंधारे यात दरवर्षी मोठ्या प्रमाणत गणेश मूर्तीचे विसर्जन ,निर्माल्य मोठ्या प्रमाणत नदी मध्ये टाकले जाते. यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते व याचा फटका जलचर प्राण्याना सुद्धा होतो. याबाबत गांभीर्याने दखल घेत सलग तिसऱ्या वर्षी चांदोरी आपत्ती व्यवस्थापन समिती व सायखेडा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्र म राबविण्यात आला.
या वेळी आपत्ती व्यवस्थापन समितीचे वैभव उफाडे, किसन जाधव ,अजय चारोस्कर , फिकरा धुळे ,बाळू आंबेकर ,राजू टर्ले ,सोमनाथ कोटमे ,सचिन कांबळे तसेच ,सायखेडा पोलीस ठाणे चे पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ ,पोलीस कर्मचारी ,ग्रामसेवक संजय मते उपस्थित होते.