नाशिक : बाजारपेठांमध्ये नागरिकांना खरेदीसाठी पाच रुपये प्रतिव्यक्तीप्रमाणे प्रवेश शुल्कासह केवळ एकच तास उपलब्ध करून देण्याचा अफलातून प्रयोग शहरातील मुख्य बाजारपेठांसह विविध उपनगरांमधील बाजारांमध्ये सोमवारी (दि.२९) पोलीस व मनपा प्रशासनाकडून राबविण्यास सुरुवात करण्यात आली. दुपारनंतर मेनरोड, शिवाजीरोड येथील मुख्य बाजारपेठेकडे जाणारे महत्त्वाचे रस्ते पोलिसांनी बॅरिकेडिंग करत बंद केले. या भागात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला पाच रुपयांची पावती मनपा कर्मचाऱ्यांकडून दिली जात होती.शहर व परिसरात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. जिल्हा प्रशासनाने विविध प्रकारचे निर्बंध जारी केले आहे; मात्र नागरिकांकडून बाजारपेठांमध्ये नियमांचे उल्लंघन होतच असल्याने पोलीस व मनपा प्रशासनाने या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी खरेदीसाठी वेळमर्यादा अन् प्रवेश शुल्क वसुलीची मात्रा शोधून काढली आहे. या प्रत्येक पॉइंटवर मनपा कर्मचाऱ्यांसोबत पोलीस कर्मचारीही दोन सत्रांत बंदोबस्तासाठी तैनात राहणार असल्याचे उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगितले.
या ठिकाणीही असणार हाच नियम सिटी सेंटर मॉल (प्रवेश शुल्क-५ रु. वेळ: एक तास) पंचवटी येथील बाजार समिती पवननगर भाजी मार्केट, सिडको अशोकनगर भाजी मार्केट, सातपूर कलानगर भाजी मार्केट, इंदिरानगरविक्रेते, कर्मचाऱ्यांना पासबाजारपेठांमधील विक्रेते व त्यांच्याकडील कामगारांना प्रवेशासाठी भद्रकाली, अंबड, सातपूर, इंदिरानगर पोलीस ठाण्यांच्यावतीने विहित नमुन्यातील पास दिले जाणार आहेत. हे पास दाखवून त्यांना बाजारपेठेत आपापल्या व्यवसायासाठी जाता येणार आहे.