स्वस्त धान्य विक्री केंद्र ठरु शकते ह्यकोरोनाह्णचे संक्रमणाचे केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 04:57 PM2020-09-26T16:57:08+5:302020-09-26T16:57:49+5:30
सिन्नर: एप्रिल महिन्यापासून बंद असलेली रेशन दूकानातील बायोमेट्रिक प्रणाली पुन्हा कार्यान्वीत करण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने रेशन वाटपासाठी ह्यबायोमेट्रिकह्ण पध्दत पुर्वीप्रमाणे राबविण्याचा निर्णय घेतल्याने कोरोनाचा वाढता प्रार्दूभाव लक्षात घेता या निर्णयाच्या फेरविचाराची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा स्वस्त धान्य विक्री केंद्र बायोमेट्रिक मशीनमुळे कोरोना संक्रमणाचे केंद्र ठरल्यास नवल वाटू नये.
सिन्नर: एप्रिल महिन्यापासून बंद असलेली रेशन दूकानातील बायोमेट्रिक प्रणाली पुन्हा कार्यान्वीत करण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने रेशन वाटपासाठी ह्यबायोमेट्रिकह्ण पध्दत पुर्वीप्रमाणे राबविण्याचा निर्णय घेतल्याने कोरोनाचा वाढता प्रार्दूभाव लक्षात घेता या निर्णयाच्या फेरविचाराची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा स्वस्त धान्य विक्री केंद्र बायोमेट्रिक मशीनमुळे कोरोना संक्रमणाचे केंद्र ठरल्यास नवल वाटू नये.
मार्च अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवसाचा ह्यजनता कफ्यूह्ण लावला. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून लॉकडाऊन झाले. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून रेशन दुकानात बायोमेट्रिक पध्दतीने रेशन वाटप बंद करण्यात आले होते. कोरोनाचा ससंर्ग होऊ नये म्हणून बायोमेट्रिक बंद करण्यात आले होते. मात्र अन्न व नागरी पुरवठा विभागाने आॅगस्ट महिन्यापासून पुन्हा बायोमेट्रिक मशीनद्वारे रेशन वितरणास प्रारंभ केला. चार महिन्यानंतर उलट आता कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली आहे. देश, राज्य, जिल्हा व तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. असे असतांना पुन्हा बायोमेट्रिक प्रणालीद्वारे रेशन वाटप करण्याचा निर्णय कितपत योग्य आहे हे येणारा काळच सांगेल.
कोरोनामुळे राज्य व जिल्ह्यात मृतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर कोरोनाबाधितांचा आकडाही मोठा वाढला आहे. कोरोनामुळे लाखों लोकांचे रोजगार गेले. अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे हजारो लोक अन्नपाण्यावाचून रस्यावर आल्याचे दृष्य एप्रिल व मे महिन्यात पहायला मिळाले. अनेकांनी चार-पाचशे किलोमीटर पायी चालून घर जवळ केले होते. गावात गेल्यानंतर त्यांना आधार मिळाला तो गावातील सरकारी स्वस्त धान्य दुकातील धान्याचा. हा शासनाचा निर्णय अतिशय योग्य होता. मात्र आता एप्रिल-मे महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असतांना पुन्हा बायोमेट्रिक पध्दतीने रेशन वितरणाचा निर्णय झाल्याने दुकानात रेशन घ्यायला जाणारे लाभार्थी व स्वस्त धान्य दुकानदार या दोघांना मशीनवर बोट उमटविण्याासाठी बोट टेकवतांना अंगावर काटा उभा राहात असल्याचे चित्र आहे. त्यात रेशन दुकानातील बायोमेट्रिकचे सर्व्हस डाऊन राहात असल्याने ग्राहकांना तास्तास रांगेत गर्दीत उभे राहावे लागत आहे.
सुविधांबाबत सांशकता..
१ आॅगस्टपासून बायोमेट्रिक पध्दत सुरु करण्यात आली आहे. अंगठा लावल्यानंतरच धान्य मिळते. मात्र दुकानात सॅनिटायझर आणि इतर सुविधा किती दुकानात पुरवल्या जातात याबाबत सांशकता आहे. रेशन घेण्यासाठी होणारी गर्दीत सोशल डिस्टिंगसिंग पाळले जाते का? सर्वांच्या हाताला सॅनिटायझर लावले जाते का याबाबत सांशकता आहे. त्यामुळे रेशन दुकान कोरोना संक्रमणाचे केंद्र होेऊ शकते.
अंगठा नाही तर धान्य नाही
१ आॅगस्टपासून शासनाने स्वस्त धान्य नेण्यासाठी बायोमेट्रिक मशीनवर अंगठा लावणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता अंगठा लावल्याशिवाय धान्य मिळणार नाही. कोरोनाच्या धास्तीने अगोदर नागरिकांमध्ये भीती आहे. त्यात या निर्णयामुळे नागरिकांना जीव मुठीत धरुन स्वस्त धान्य मिळविण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे.
ह्यबायोमेट्रिक पध्दतीने रेशन वाटपास दुकानदारांची हरकत नाही. मात्र सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने येणारे लाभार्थी अंगठा टेकविण्यास कचरतात. कोरोनाचा संसर्ग होण्यास घाबरतात. त्यामुळे कोरोना संसर्ग कमी होईपर्यंत दुकानदार आणि लाभार्थी संकटात येऊ नये यासाठी या निर्णयाच्या फेरविचार होण्याची गरज आहे. त्यात बायोमेट्रिक मशीनचे सर्व्हर नेहमी डाऊन असते. त्यामुळे रेशन घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना तासंतास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे धोका आणखी वाढतो.
सतीश भुतडा, अध्यक्ष, सिन्नर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना