शेतकऱ्यांनी उभारले चेकपोस्ट
By admin | Published: June 2, 2017 12:27 AM2017-06-02T00:27:00+5:302017-06-02T00:27:15+5:30
येवला येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांच्या चाकातील हवा सोडून वाहने रोखून धरण्यात आली. आंबे, केळीसह अन्य माल घेऊन जाणारे ट्रक फोडण्यात आले
येवला येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांच्या चाकातील हवा सोडून वाहने रोखून धरण्यात आली. आंबे, केळीसह अन्य माल घेऊन जाणारे ट्रक फोडण्यात आले. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी न फिरकल्याने व्यवहार ठप्प होते. शेतकऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी स्वयंघोषित चेकपोस्टच उभारले होते. प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करून शेतमालाची वाहने रोखून धरली जात होती.
पोलीस उपअधीक्षक राहुल खाडे यांनी काही काळ वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. रेल्वे पटरीच्या बाजूने दगडफेक झाली. पोलीस व राज्य राखीव दलाच्या तुकड्यांनी सौम्य लाठीमार केल्याने शेतकरी काही काळ दूर गेले तरी पुन्हा पुन्हा जागा बदलून रास्ता रोको करण्यात येत होता.
येवला-कोपरगाव रस्त्यावर पिंपळगाव टोलनाक्यावर सर्वसामान्य शेतकरी युवक आंदोलनात उतरलेला दिसला.
आंदोलनाचे नेतृत्व नेमके कोण करीत आहे हेच समजत नव्हते, तर येवला-विंचूर चौफुलीवर अरु ण काळे, रमेश बोरनारे, रवींद्र बोरनारे, शरद बोरनारे, सुभाष वाबळे, भारत धनगे, संतोष वाबळे, योगेश गायकवाड, सागर घोडके, संतोष पोटे, अमोल गायकवाड, चंदू चोळके, प्रमोद गायकवाड, गणेश बोरनारे, उत्तम साळुंके, श्याम त्रिवेदी, उत्तम गायकवाड, सोमनाथ साताळकर, पिंटू मोरे, अमोल खामकर, दत्ता जमधडे, राजेश जमधडे, सुधाकर वाल्हेकर, बाळासाहेब वाल्हेकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. सावरगाव चौफुलीवर बाळासाहेब पवार यांच्यासह त्यांचे सुमारे सात गावांतील शेतकरी समर्थक येथे रस्त्यावर उतरले होते.