शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
3
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
4
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
5
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
6
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
7
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
8
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
9
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
10
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
11
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
12
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
13
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
14
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
15
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
16
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
17
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
18
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
19
हळद लागली! शोभिता धुलिपालाला लागली चैतन्यच्या नावाची हळद, समोर आले प्री वेडिंगचे फोटो
20
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?

शेतकऱ्यांनी उभारले चेकपोस्ट

By admin | Published: June 02, 2017 12:27 AM

येवला येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांच्या चाकातील हवा सोडून वाहने रोखून धरण्यात आली. आंबे, केळीसह अन्य माल घेऊन जाणारे ट्रक फोडण्यात आले

 येवला येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांच्या चाकातील हवा सोडून वाहने रोखून धरण्यात आली. आंबे, केळीसह अन्य माल घेऊन जाणारे ट्रक फोडण्यात आले. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी न फिरकल्याने व्यवहार ठप्प होते. शेतकऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी स्वयंघोषित चेकपोस्टच उभारले होते. प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करून शेतमालाची वाहने रोखून धरली जात होती. पोलीस उपअधीक्षक राहुल खाडे यांनी काही काळ वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. रेल्वे पटरीच्या बाजूने दगडफेक झाली. पोलीस व राज्य राखीव दलाच्या तुकड्यांनी सौम्य लाठीमार केल्याने शेतकरी काही काळ दूर गेले तरी पुन्हा पुन्हा जागा बदलून रास्ता रोको करण्यात येत होता. येवला-कोपरगाव रस्त्यावर पिंपळगाव टोलनाक्यावर सर्वसामान्य शेतकरी युवक आंदोलनात उतरलेला दिसला. आंदोलनाचे नेतृत्व नेमके कोण करीत आहे हेच समजत नव्हते, तर येवला-विंचूर चौफुलीवर अरु ण काळे, रमेश बोरनारे, रवींद्र बोरनारे, शरद बोरनारे, सुभाष वाबळे, भारत धनगे, संतोष वाबळे, योगेश गायकवाड, सागर घोडके, संतोष पोटे, अमोल गायकवाड, चंदू चोळके, प्रमोद गायकवाड, गणेश बोरनारे, उत्तम साळुंके, श्याम त्रिवेदी, उत्तम गायकवाड, सोमनाथ साताळकर, पिंटू मोरे, अमोल खामकर, दत्ता जमधडे, राजेश जमधडे, सुधाकर वाल्हेकर, बाळासाहेब वाल्हेकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. सावरगाव चौफुलीवर बाळासाहेब पवार यांच्यासह त्यांचे सुमारे सात गावांतील शेतकरी समर्थक येथे रस्त्यावर उतरले होते.