दिवंगत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना धनादेश प्रदान
By admin | Published: May 17, 2014 12:30 AM2014-05-17T00:30:00+5:302014-05-17T00:31:27+5:30
नाशिक : महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या पंचवटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड कॉम्प्युटर सायन्स या महाविद्यालयाचा दिवंगत विद्यार्थी दीपक दगू बागुल याच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या विद्यार्थी सुरक्षा विमा योजनेअंतर्गत अशी मदत देण्यात येते. दीपकचे काही दिवसांपूर्वी अपघातात निधन झाले होते. दीपकची आई रंजना दगू बागुल यांना संस्थेचे सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब जगदाळे यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. अरुण पाटील, विभाग प्रमुख प्रा. दीप्ती भुतडा, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. शैलेश यावलकर आदि उपस्थित होते.

एकदिवसीय विज्ञान कार्यशाळेचे आयोजन
नाशिक : मुलांच्या मनातील कुतूहल जागृत करून त्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी संडे सायन्स स्कूल, नाशिक यांच्या वतीने मुलांसाठी एकदिवसीय विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत रंग बदलणारे पाणी, डी. सी. मोटर, विद्युतचंुबक तयार करणे, फुफ्फुसातील हवा मोजण्याचे प्रयोग, विमान बनविणे व उडविणे, मोटरबोट, प्रकाशाचे विविध प्रयोग, अनंत प्रतिमा आदि प्रयोगामागील विज्ञान विद्यार्थी स्वत: समजून घेऊन स्वत: बनविणार आहेत. प्रयोगासाठी आवश्यक साहित्य व सविस्तर माहिती प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार असून, हे तयार केलेले साहित्य, मॉडेल त्यांना घरीच दिले जाणार आहे. ज्यामुळे ते घरी गेल्यावरही हे प्रयोग पुन्हा पुन्हा करू शकतात. १० वर्ष व त्यापुढील सर्व विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा खुली आहे. कार्यशाळा दि. १८ रोजी स. १० ते सायं. ६ पर्यंत असेल. अधिक माहितीसाठी विज्ञान प्रबोधनी, ५९, प्रधान पार्क, एम. जी. रोड येथे संपर्क साधावा, असे आवाहन चैताली नेरकर यांनी केले आहे.