छावा जनक्रांतीची बेजबाबदार रुग्णालयांवर कारवाईची मागणी ; वीजबील वाढीचा मुद्दाही मांडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 01:53 PM2020-07-02T13:53:54+5:302020-07-02T13:55:25+5:30
काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाविषयी बेजबाबदारपणे काम सुरू असून, कॅनडा कॉर्नर परिसरातील एका रुग्णलायाविरोधात अशाचप्रकारे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना न करता रुग्णांच्या आरोग्यविषयी निष्काळजीपणा दाखविण्यात येत असल्याचा आरोप छावा जनक्रांती संघटनेच्या महासचिव अॅड. अलका शेळके-मोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निवेदनाच्या माध्यमातून केला आहे.
नाशिक : शहातील काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाविषयी बेजबाबदारपणे काम सुरू असून, कॅनडा कॉर्नर परिसरातील एका रुग्णलायाविरोधात अशाचप्रकारे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना न करता रुग्णांच्या आरोग्यविषयी निष्काळजीपणा दाखविण्यात येत असल्याचा आरोप छावा जनक्रांती संघटनेच्या महासचिव अॅड. अलका शेळके-मोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.२) जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केला आहे.
नाशिक शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात कोरोना रुग्णाचा खुलेआम वावर असून, त्यांचा अन्य रु ग्ण व त्यांच्या नातेवाइकांशीही संबंध येत असल्याने कोरोनाचा फैलाव वाढण्याची भीती व्यक्त करीत अशा संघटनेची राज्यस्तरीय समितीकडून चौकशी करण्याची मागणी संघटनेतर्फे करण्यात आली. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना झालेल्या बोगस बियाण्यांच्या पुरवठयास जबाबदार व्यक्तींसह ग्राहकांना वाढीव वीज बिलांचा झटका देणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या पधादिकाऱ्यांनी केली आहे. दरम्यान, संघनटेने यासंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व मुख्यमंत्री कार्यालयास यापूर्वीही निवेदन दिले असून, संबंधित रुग्णालयावर कारवाई झाली नाही, त्यामुळे संघटनेने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनचा इशारा दिला होता. त्यापार्श्वभूमीव कोणतीही अनपेक्षित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात चोख बंदोबस्त तैनात केला होता. मात्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्याची भेट घेऊन याविषयांसंदर्भात चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबिधत विषयांवर गांभीर्याने कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने कोणतेही आंदोलन न करता संघटनेकडून केवळ मागण्याचे सादर करण्यात आले. यावेळी संघटनेनचे अॅड. अलका शेळके-मोरे यांच्यासह सुषमा बोरसे, निलोफर शेख, गोपाळ सोनवणे, वैभव गवाल, युवराज राजपूत, जैनब शेख आदी उपस्थित होते.