चिमुकलीने केली गंभीर आजारावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 09:20 PM2021-05-23T21:20:18+5:302021-05-24T00:24:24+5:30

लासलगाव : कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगावातील ४ वर्षाच्या चिमुकलीने कोरोनानंतर जीव घेण्या मल्टी सिस्टीम इनफेल्मेट्री डिसऑर्डर चिल्ड्रन या गंभीर आजारावर यशस्वी मात करत रविवारी घरवापसी केली आहे.

Chimukali overcomes serious illness | चिमुकलीने केली गंभीर आजारावर मात

चिमुकलीने केली गंभीर आजारावर मात

Next
ठळक मुद्देमल्टी सिस्टीम इनफेल्मेट्री डिसऑर्डर चिल्ड्रन तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

लासलगाव : कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगावातील ४ वर्षाच्या चिमुकलीने कोरोनानंतर जीव घेण्या मल्टी सिस्टीम इनफेल्मेट्री डिसऑर्डर चिल्ड्रन या गंभीर आजारावर यशस्वी मात करत रविवारी घरवापसी केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील पहिला रुग्ण आढल्याने आरोग्य विभागाचे चांगले धाबे दणाणले होते. लासलगाव जवळील ब्राम्हणगाव विंचूर येथील दत्तू टर्ले यांना दोन महिन्यांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती त्यावेळी सईला ही कोरोनाची बाधा झाली मात्र त्रास न झाल्याने दुर्लक्ष करणे चांगले महागात पडले अचानक सईला ताप आला.

सर्व तपासण्या करण्यात आल्या ताप काही कमी होत नसल्याने लासलगाव येथील बालरोग तज्ञ भुपेंद्र पाटील यांच्याकडे दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तीचा मल्टी सिस्टीम इनफेल्मेट्री डिसऑर्डर चिल्ड्रन तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मुंबई येथील नानावटी रुग्णालयाचे मार्गदर्शन घेत लासलगाव सारख्या ग्रामीण भागातील या ४ वर्षांच्या चिमुकलीवर योग्य उपचार करत तीला बरे केले. 

Web Title: Chimukali overcomes serious illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.