चिंचखेडच्या शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 05:18 PM2019-08-29T17:18:51+5:302019-08-29T17:19:13+5:30

पाटील गेल्या सहा दिवसांपासून होते बेपत्ता

Chinchwad Farmer Suicide | चिंचखेडच्या शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

चिंचखेडच्या शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

Next
ठळक मुद्देपालखेड डावा कालव्याच्या पाण्यामध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत कालव्या जवळील राहणाऱ्यांना नागरिकांना दिसून आला



लोकमत न्यूज नेटवर्क
दिंडोरी : तालुक्यातील चिंचखेड येथील दत्तात्रेय देवराम पाटील या शेतक-याचा मृतदेह पालखेड डाव्या कालव्यातील पाण्यात आढळून आला. पाटील गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता होते. दरम्यान, कर्जाला कंटाळूनच पाटील यांनी आपले जीवन संपविल्याची चर्चा आहे.
दत्तात्रेय पाटील हे गेल्या शनिवार (दि.२४) पासून घरातून बेपत्ता झाले होते. पाटील यांच्या कुटुंबीयांनी वणी पोलीस ठाण्यामध्ये हरवल्याची तक्र ार दाखल केली होती. तसेच व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून देखील पाटील यांच्या फोटोसह माहिती देण्यात आली होती.अखेर गुरु वारी (दि.२९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास पालखेड डावा कालव्याच्या पाण्यामध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत कालव्या जवळील राहणाऱ्यांना नागरिकांना दिसून आला. परंतु मृतदेह पाण्यात असल्याने ओळख पटत नव्हती. अथक प्रयत्नानंतर घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला असता बेपत्ता असलेले चिंचखेडचे पाटील यांचाच मृतदेह असल्याचे आढळून आले. पाटील यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. त्यांच्यावर बँक आॅफ इंडियाचे २५ लाख रु पयांचे कर्ज होते. त्यांना काही दिवसांपूर्वी बँकेतून फोनही येत होते, सततची नापिकी आणि वाढत चाललेला कर्जाचा डोंगर त्यामुळे बँकेचे कर्ज भरण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्याने त्यांनी नैराश्यातून पालखेड डावा कालवा मध्ये उडी मारून आपली जीवनयात्रा संपवल्याचे सांगितले जाते. दरम्यान, वणी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Chinchwad Farmer Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.