नाशिक: सिडकोसह परिसरात यंदा घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळकडून साधेपणाने विसर्जन करण्यात येत आहे .सर्वाधिक मंडळांकडून कृत्रिम तलावात तर घरगुती नागरिक आपल्या घरातील टपात गणरायाचे विसर्जन करीत असल्याचे चित्र बघाव्यात मिळत आहे.
सिडको व अंबड भागात यंदाच्या वर्षी मागील वर्षीच्या तुलनेत सार्वजनिक मंडळांची घट दिसून आली तसेच सार्वजनिक मंडळांनी शासनाने लागू केलेल्या गाईडलाईन नुसार गणरायाची स्थापना करण्यात केली होती. मंगळवारी सार्वजनिक मंडळाकडून साधेपणाने गणरायाचे विसर्जन करण्यात आले. महापालिकेच्यावतीने सिडको भागात सहा ठिकाणी मूर्ती संकलन करण्यासाठी व्यवस्था केली आहे तसेच गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे.
सकाळी आठ वाजेपासून सिडकोतील राजे संभाजी स्टेडियम, पवन नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ ,खुटवड नगर येथील आयटीआय पूल, गोविंद नगर येथील जिजाऊ वाचनालय आदी भागात नागरिकांनी गणेश विसर्जनासाठी गर्दी केली होती गणेश विसर्जन करण्याच्या ठिकाणी सोशल डिस्टेंस वापर करण्यात आल्याचा प्रामुख्याने दिसून आले दुपारी दोन वाजेपर्यंत सिडकोतील कृत्रिम तलावांमध्ये तसेच मूर्ती दान करण्याच्या प्रक्रियेत मागील वर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घट दिसून आली. दुपारी दोन वाजेपर्यंत पवननगर येथील पाण्याच्या टाकीजवळ सुमारे पाचशे तर खुटवड नगर येथील घाटावर सुमारे सातशे मूर्ती संकलित करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.