सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदारांची वसुली मोहीम सुरू आहे. मागील वर्षाच्या तुलनेत आजपर्यंत घरपट्टीत २५ लाख, तर पाणीपट्टीत दोन कोटी रुपये इतकी वाढ झाल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू आहे. ज्या थकबाकीदारांकडे घरपट्टीची २५ हजारांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत थकबाकी आहे अशा सुमारे २२०० थकबाकीदारांना मनपाच्या वतीने जप्तीपूर्वीचे सूचनापत्र बजावले आहे. यानंतरही थकबाकी न भरणाऱ्यांवर मनपाच्या वतीने जप्ती मोहीम राबविण्यात येणार असल्याचे विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी यांनी सांगितले.मागील वर्षी १० जानेवारीपर्यंत मनपाने घरपट्टीची नऊ कोटी ९२ लाख इतकी वसुली केली होती. यंदाच्या वर्षी दहा कोटी १८ लाख इतकी वसुली झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत घरपट्टीत २५ लाख रुपयांची वाढ झाली आहे, तर पाणीपट्टीची मागील वर्षी १० जानेवारीपर्यंत तीन कोटी २९ लाख इतकी वसुली झाली होती. यंदाच्या वर्षी १० जानेवारीपर्यंत पाच कोटी ३२ लाख इतकी वसुली झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे दोन कोटी दोन लाख रुपयांनी वाढ झाल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले आहे. (वार्ताहर)
सिडकोत थकबाकी वसुली मोहीम
By admin | Published: January 15, 2015 12:36 AM