नाशिक- कोरोनाच्या विरोधात लढा देण्याचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यु लागु करण्याचे आवाहन केले आहे त्याला सोशल मिडीयावर चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकांनी अशाप्रकारे जनता कर्फ्यू मध्ये सहभागी असे आवाहन केले आहे.
चीन मधून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि अनेक देशात तो पसरला. भारतही त्याला अपवाद राहीलेला नाही. केंद्र आणि राज्यशासनाकडून यासंदर्भात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुख्य म्हणजे नागरीकांना सजग केले जात आहे. तसेच त्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. नागरीकांचा देखील त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तथापि, आता ३१ मार्च पर्यंत कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचे पालन करतानाच सुट्टीचा दिवस म्हणून अकारण गर्दी वाढू नये यासाठी २२ मार्च रोजी जनता कफ्युचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी (दि.१९) केले. त्याला प्रतिसाद मिळावा यासाठी अनेक संस्था आणि व्यक्तीगत पातळीवर त्याचे समर्थन करण्यात आले आहे.
काही नागरीकांनी तर सोशल मिडीयावर समर्थन करताना मी शपथ घेतो की असे नमुद करून मी व माझे कुटूंबिय रविवारी (दि.२२) चौदा तास जनता कफ्युचे पालन करेल असे नमुद केले आहे.