नाशिकरोड : शहर गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी गुंडगिरी, टवाळखोरगिरी, अवैध धंदे समूळ नष्ट केले जातील. मात्र नागरिकांनीही सतर्क राहून संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याबाबत पोलिसांना तत्काळ माहिती देणारे पोलिसांचे कान व डोळे बनावे, असे आवाहन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले.नाशिक पोलीस आयुक्तालया तर्फे सिन्नरफाटा येथील एका लॉन्स मध्ये गुरुवारी सायंकाळी आयोजित पोलीस-जनता परिसंवादामध्ये बोलताना नांगरे-पाटील म्हणाले की, सर्वसामान्यांचे पोलीससेवक असून, महिलांना पोलीस ठाणे माहेरघर कसे वाटेल हे महत्त्वाचे आहे.यावेळी उपायुक्त अमोल तांबे, गुन्हे शाखा उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक पोलीस आयुक्त ईश्वर वसावे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माइनकर, भारतकुमार सूर्यवंशी, पंढरीनाथ ढोकणे, देवीदास वांजळे आदी उपस्थित होते.यावेळी नगरसेवक राहुल दिवे, पंडित आवारे, सत्यभामा गाडेकर, प्रशांत दिवे, ज्येष्ठ नागरिक संघाचे रमेश जाधव, कोटमगावचे सरपंच अध्यक्ष बाळासाहेब म्हस्के, आकाश भालेराव, राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे, शिवानी आगळे, शेवगेदारणा येथील पोलीसपाटील उज्ज्वला कासार आदींनी दारू विक्री, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, टवाळखोरांचा धुडगूस, टोर्इंग कारवाई, अल्पवयीन गुन्हेगारांचे वाढलेले प्रमाण, भिकाऱ्यांचा वाढलेला वावर, गुन्हे दाखल करण्यास पोलीस ठाण्यात होणारी टाळाटाळ, टवाळखोरांचे समुपदेशन, रस्त्यांवर विनाकारण उभी केले जाणारे बॅरिकेड््स अशा प्रातिनिधिक स्वरूपात आपापल्या भागातील सूचना व समस्या मांडत पोलिसांनी उपाययोजना करून त्यांना आळा घालण्याची मागणी केली.पौर्णिमा चौगुले यांनी याप्रसंगी गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी याविषयी एलसीडी प्रोजेक्टरद्वारे सादरीकरणातून माहिती दिली. नागरी सुरक्षा यंत्रणाबाबत संचालक सुभाष कोरडे यांनी माहिती देत नागरी सुरक्षा यंत्रणेच्या कार्यपद्धतीचे प्रात्यक्षिक दाखविले. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सहकार्य करणाºया आशा गोडसे, कौसर आझाद, परेश बागड, प्रशांत मोहाडीकर, जितेंद्र पटेल, जयश्री खर्जुल, संतोष साळवे, सचिन भोर आदींचा नांगरे-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक उपायुक्त अमोल तांबे यांनी केले. यावेळी नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प भागातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.ब्लू प्रिंट तयारशहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ब्लू प्रिंट तयार केली असून, मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकाची स्थापना केली आहे. सर्वसामान्यांचा पोलिसांवर प्रेशर व सर्पोट ग्रुप राहिला पाहिजे. पोलिसांच्या कामात नागरिकांनी अॅक्टिवपणे सहभागी व्हावे, असे आवाहन नांगरे-पाटील यांनी केले.
नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता : विश्वास नांगरे-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 12:54 AM