खर्डे ; देवळा तालुक्यातील मटाने येथे ४५ वर्षांवरील नागरिकांचा कोविड प्रतिबंध लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्हा परिषद शाळा मटाणे याठिकाणी लसीकरण मोहीम राबवण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि.१२) प्राथमिक आरोग्य केंद्र मटाने येथे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. नागरिकांनी सोशल डिस्टन्स नियमांचे पालन केले. प्रथम लसीकरण माजी सरपंच श्रीमती शकुंतला कानडे यांना करण्यात आले.
याप्रसंगी यावेळी सरपंच भाऊसाहेब आहेर, खर्डे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अलका सपकाळे व डॉ. जाणकार, ग्रामसेवक अनिल आहेर, समुदाय आरोग्य अधिकारी तीलोत्तमा देवरे ग्रामपंचायत सदस्य समाधान केदारे, रवींद्र केदारे, जनार्दन पाटील, आरोग्यसेविका एस. एन. भामरे, आरोग्यसेवक शिवाजी सोनवणे, आशासेविका सुरेखा आहेर, वंदना पवार,प्रमिला पवार, अंगणवाडी सेविका कमल आहेर, संगीता पाटील, योगिता साबळे, ग्रामपंचायत कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.