रामनगर परिसरात बिबट्याच्या संचाराने नागरिकांत घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 11:06 PM2019-04-02T23:06:02+5:302019-04-02T23:06:51+5:30

रामनगर : परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावालगत असलेल्या बाबाजी भीमा चव्हाण यांच्या उसाच्या शेतात बिबट्या परिसरातील शेतकऱ्यांना दिसून आला आहे.

Citizens scare away in the Ramnagar area | रामनगर परिसरात बिबट्याच्या संचाराने नागरिकांत घबराट

रामनगर परिसरात बिबट्याच्या संचाराने नागरिकांत घबराट

Next
ठळक मुद्देरामनगर परिसरात बिबट्याचे सातत्याने ग्रामस्थांना दर्शन होत आहे.

रामनगर : परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावालगत असलेल्या बाबाजी भीमा चव्हाण यांच्या उसाच्या शेतात बिबट्या परिसरातील शेतकऱ्यांना दिसून आला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून शेतकºयांच्या बिबट्या नजरेस पडत होता. तसेच किरण चव्हाण, पांडुरंग खालकर यांचे दोन कुत्रेदेखील बिबट्याने फस्त केले आहेत. ज्ञानेश्वर थेटे यांनी तात्काळ वनविभागाला याची माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाºयांनी तात्काळ धाव घेतली असता त्यांना शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. वनविभागाने तात्काळ चव्हाण यांच्या शेतात पिंजरा लावला. रामनगर परिसरात सध्या ऊसतोड मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने बिबट्याला लपण्यासाठी जागा कमी झाल्यामुळे बिबट्या परिसरात सर्रासपणे फिरत आहे. त्यामुळे रामनगर परिसरात बिबट्याचे सातत्याने ग्रामस्थांना दर्शन होत आहे.
कामगारांमध्ये बिबट्यामुळे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. वनविभागाने जास्तीत जास्त पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.रामनगर परिसरात नेहमीच बिबट्याचा संचार असतो. शेतात काम करताना जीव मुठीत धरूनच काम करावे लागते. त्यामुळे वनविभागाने बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा.
- रामकिसन चव्हाण,
शेतकरी, रामनगर

Web Title: Citizens scare away in the Ramnagar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.