मोहाडी केंद्रावर नागरिकांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:15 AM2021-05-09T04:15:52+5:302021-05-09T04:15:52+5:30

तालुक्यातील अनेक केंद्रावर नागरिकांचे वाद होताना बघायला मिळत आहे. १० वाजेपासून लसीकरण सुरू होणार असले, तरी नागरिक मात्र पहाटेपासूनच ...

Citizens sit at Mohadi Center | मोहाडी केंद्रावर नागरिकांचा ठिय्या

मोहाडी केंद्रावर नागरिकांचा ठिय्या

Next

तालुक्यातील अनेक केंद्रावर नागरिकांचे वाद होताना बघायला मिळत आहे. १० वाजेपासून लसीकरण सुरू होणार असले, तरी नागरिक मात्र पहाटेपासूनच रांगा लावत आहेत. मोहाडी येथे नागरिकांनी लसीकरणासाठी प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर त्यातून मार्ग निघाला.

मोहाडी येथील लसीकरण केंद्रावर परिसरातील नागरिकांपेक्षा अन्य जिल्ह्यांतील नागरिक बुकिंग करून लस घेत आहेत, तर स्थानिकांना मात्र तासन् तास उभे राहूनही लस मिळत नाही, त्यामुळे वादाचे प्रसंग घडत आहे. शनिवारी (दि.८) फक्त १०० लसींचे डोस उपलब्ध झाले असून, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारित १२ गावे येत असल्याने, तेथील लोकप्रतिनिधीसह मोहाडीचे माजी उपसरपंच सुधाकर सोमवंशी, लक्ष्मण देशमुख, शंकर ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला. यावेळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.लोणे यांनी नागरिकांची समजूत काढत मार्ग काढला, तर दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात मनसेचे उपजिल्हाप्रमुख मनोज ढिकले, अमर राजे, रणजीत देशमुख, संदीप बोरस्ते, नितीन देशमुख, दिलीप बोरस्ते, नीलेश शिंदे आदींनी लसीकरणाबाबत डॉ.विलास पाटील यांना जाब विचारला. यावेळी डॉ.विलास पाटील यांनी नागरिकांची समजूत काढत दुपारी शहरातील ६० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

इन्फो

प्रत्येक केंद्रावर झुंबड

खासगी केंद्रांवर ही लस उपलब्ध नसल्यामुळे अखेर शासकीय केंद्रांवर जावे लागते. आता मात्र शासकीय केंद्रांवरही मोजकाच साठा उपलब्ध असल्याने नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. तालुक्यातील प्रत्येक केंद्रावर क्षमतेपेक्षा दुप्पट गर्दी दिसून येत आहेत. गेले काही दिवस तालुक्यात येणारा साठा कमी-जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे असलेल्या साठ्याचे व्यवस्थित नियोजन आणि नागरिकांना मार्गदर्शन केले, तर लसीकरणाची ही मोहीम अखंडपणे चालू राहील आणि नागरिकांनाही मनस्ताप होणार नाही.

फोटो- ०८ मोहाडी लसीकरण

मोहाडी येथील आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावर नागरिकांनी लसीकरणासाठी मांडलेला ठिय्या.

===Photopath===

080521\08nsk_46_08052021_13.jpg

===Caption===

 फोटो- ०८ मोहाडी लसीकरण मोहाडी येथील आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावर नागरिकांनी लसीकरणासाठी मांडलेला  ठिय्या. 

Web Title: Citizens sit at Mohadi Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.