कामगारांच्या मागण्यांसाठी निफाडला सीटूचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 06:11 PM2019-01-08T18:11:58+5:302019-01-08T18:12:15+5:30

जुन्या सरकारी दवाखान्यापासून या मोर्चाला प्रारंभ

Citu's Front of Niphadla for the demands of the workers | कामगारांच्या मागण्यांसाठी निफाडला सीटूचा मोर्चा

कामगारांच्या मागण्यांसाठी निफाडला सीटूचा मोर्चा

Next
ठळक मुद्देशेतक-यांना २४ तास वीज मिळावी, सरकारने शेतकरी विरोधी धोरण बदलावे आदीसह विविध मागण्या

निफाड : कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या दोन दिवसीय संपाच्या पाशवभूमीवर नाशिक वर्कर्स युनियन व निफाड नगरपंचायत सिटू कामगार संघटना यांच्यावतीने मंगळवारी(दि.८) निफाड तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
निफाड येथील जुन्या सरकारी दवाखान्यापासून या मोर्चाला प्रारंभ झाला. या मोर्चात पिंपळगाव बसवंत येथील सिग्नेचर इंटरनॅशनल फूड्स या कंपनीचे कामगार तसेच निफाड नगरपंचायत सिटू कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र शिंदे, वसंत बोरसे , विनोद गांगुर्डे , बंडू बागुल , सूर्यभान झाल्टे , संदीप कोकणे , सुनील गांगुर्डे , गणेश बोडाई , सौ. सरोज बेलवान यांच्यासह निफाड नगरपंचायतीचे कामगार सहभागी झाले होते. हा मोर्चा भवर गल्ली, शनी मंदिर, शिवाजी चौकमार्गे तहसीलदार कचेरीवर आला. या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. याप्रसंगी बंडू बागुल ,राजेंद्र शिंदे ,संदीप कोकणे यांची भाषणे झाली. मोर्चेकर्यांनी निफाडच्या नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांना निवेदन दिले. नगरपंचायत कर्मचा-यांचे समावेशन झालेच पाहिजे, कामगारांना १८ हजार किमान वेतन मिळावे, शेतक-यांना २४ तास वीज मिळावी, सरकारने शेतकरी विरोधी धोरण बदलावे आदीसह विविध मागण्या मांडण्यात आल्या.

Web Title: Citu's Front of Niphadla for the demands of the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.