सिपेट सेंटरच्या प्रस्तावित जागेची शहरात पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:14 AM2021-03-27T04:14:56+5:302021-03-27T04:14:56+5:30
नाशिक विभागात बेरोजगार तरूणांची संख्या मोठी आहे. त्यांना रोजगाराविषयी कुशल शिक्षण-प्रशिक्षण मिळून औद्योगिक वसाहतीत रोजगार मिळावा यासाठी नाशिक येथे ...
नाशिक विभागात बेरोजगार तरूणांची संख्या मोठी आहे. त्यांना रोजगाराविषयी कुशल शिक्षण-प्रशिक्षण मिळून औद्योगिक वसाहतीत रोजगार मिळावा यासाठी नाशिक येथे सिपेट सेंटर व्हावे अशी मागणी केली जात होती. त्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी पाठपुरावा केला होता. शासनाने नाशिक येथील सिपेट केंद्राला तत्वतः मान्यता दिली होती. या केंद्रासाठी पंधरा एकर जागेची गरज असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नाशिक तालुक्यातील शिंदे, सैय्यद पिंप्री, गोवर्धन, दरी आणि सिन्नर तालुक्यातील माळेगाव एमआयडीसी येथील शासकिय जागा सुचविण्यात आल्या. शुक्रवारी औरंगाबाद येथील सिपेटचे संचालक कमलजीत घई यांनी जिल्हा दौरा करून गोवर्धन, शिंदे येथील प्रस्तावित जागांची तसेच औद्योगिक वसाहतींमधील नाशिक इंडस्ट्रियल क्लस्टरच्या सातपूर, अंबड येथील जागांची पाहणी केली. यावेळी खासदार हेमंत गोडसे, सिपेटचे प्रविण बच्छाव,भारत देषमुख यांच्यासह एस.के.माथूर, विक्रम सारडा, नरेंद्र बिरारी, संजीव नारंग आदी उपस्थित होते. येत्या दोन दिवसांत याविषयीचा अहवाल सिपेटच्या चेन्नई येथील मुख्य कार्यालयाकडे तसेच दिल्ली मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती कमलजीत घई यांनी दिली आहे.
(फोटो २६ सीपेट)