शिवसेनेचा थेट स्थायी समितीच्या सभापतिपदावरच दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 01:39 AM2019-02-21T01:39:43+5:302019-02-21T01:40:23+5:30
आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा-शिवसेना युती झाल्याने नेत्यांचे मनोमीलन स्थानिक पातळीवर मात्र अडचणीचे ठरले आहे. भाजपाच्या एका नगरसेवकाचे निधन झाल्याने पक्षीय तौलनिक बळ दोलायमान झाले असून, स्थायी समितीच्या नियुक्तीतील या पक्षाचे बहुमत एका सदस्य संख्येने घटणार आहे.
नाशिक : आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा-शिवसेना युती झाल्याने नेत्यांचे मनोमीलन स्थानिक पातळीवर मात्र अडचणीचे ठरले आहे. भाजपाच्या एका नगरसेवकाचे निधन झाल्याने पक्षीय तौलनिक बळ दोलायमान झाले असून, स्थायी समितीच्या नियुक्तीतील या पक्षाचे बहुमत एका सदस्य संख्येने घटणार आहे. दुसरीकडे मात्र सेनेची संख्या एकाने वाढल्याने भाजपाचे आठ तर सेनेचे पाच अशी संख्या होणार आहे. त्यामुळे संधी साधून सेनेने थेट सभापतिपदावरच दावा केला आहे.
यासंदर्भात बुधवारी (दि. २०) शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांच्या शीर्षपत्रावर विभागीय आयुक्त, महापौर तसेच निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त यांना निवेदन दिले आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पक्षांची गट नोंदणी विभागीय आयुक्तांकडे करावी लागते. त्यामुळे त्यांना प्राधान्याने तर महापौर सदस्यांची नियुक्ती करीत असल्याने त्यांनादेखील पत्र दिल्याची माहिती विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या भाजपाच्या ६६ नगरसेवकांची नोंदणी भाजपा गटनेते संभाजी मोरूस्कर यांनी केली असून, शिवसेनेच्या ३५ नगरसेवकांच्या गटाची नोंदणी करण्यात आली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीत सोळा सदस्य नियुक्त करण्यात येत असल्याने महापालिकेची एकूण सदस्य संख्या बघता भाजपाचे