पाटोदा येथे क्लीन व्हिलेज ग्रीन व्हिलेज कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:36 PM2020-12-27T16:36:33+5:302020-12-27T16:37:10+5:30
पाटोदा : युवकांमध्ये स्वच्छता व पर्यावरणविषयक जाणीव जागृती करण्याच्या हेतूने, युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र नाशिक द्वारा पाटोदा येथे स्वच्छ गाव-हरित गाव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी स्वच्छ गाव या संकल्पनेवर जनार्दन धनगे यांनी मार्गदर्शन केले तर हरित गाव ही संकल्पना येवला तालुका तारादूत पंकज मढवई यांनी पटवून दिली. प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संतोष घोडेराव, पाटोदा येथील पोलीस पाटील मुजमिल चौधरी, ज्ञानदीप क्लासेस चे संचालक ज्ञानेश्वर पैठणकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तौफिक शेख, उद्धव बोराडे, राम बोनाटे, महेश बारोडे, नामदेव जाधव, कमल त्रीपाठी, सुनील पंजे, दिलीप आहेर, महेश शेटे यांनी परिश्रम घेतले. (२७ येवला)