सफाई कामगार झाले थेट नोडल आॅफिसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 11:29 PM2019-11-13T23:29:21+5:302019-11-14T00:03:02+5:30
महापालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान आणि सेल्फी हजेरीच्या तपासणीचे काम चक्क कामाच्या सोयीने नियुक्त केलेल्या सफाई कामगारांना नोडल आॅफिसर नियुक्त करून घेण्यात येत असल्याने अन्य कामगार वर्गाने मात्र नाराजी व्यक्तकेली आहे.
नाशिक : महापालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान आणि सेल्फी हजेरीच्या तपासणीचे काम चक्क कामाच्या सोयीने नियुक्त केलेल्या सफाई कामगारांना नोडल आॅफिसर नियुक्त करून घेण्यात येत असल्याने अन्य कामगार वर्गाने मात्र नाराजी व्यक्तकेली आहे. म्हणजेच चतुर्थ श्रेणी कामगारांकडून वर्ग दोनमधील श्रेणीच्या अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याचा अजब प्रकार घडत आहे.
महापालिकेत सफाई कामगारांची संख्या कमी आहे. त्यातच अनेक कामगार हे कामाच्या सोयीने अन्य विभागांत जबाबदाºया पार पाडीत आहेत. तेही ठीक परंतु सफाई कामगारांना चक्क वर्ग दोनचे अधिकार दिले जात आहेत. अनेक सफाई कामगारांना कामाच्या सोयीने स्वच्छता निरीक्षक बनविण्यात येते. परंतु गेल्या काही वर्षांत स्वच्छता निरीक्षकाच्या शिक्षणक्रमाला प्रवेश घेतल्याचे पुरावे दिले तरी त्यांना थेट प्रशासन थेट विभागीय स्वच्छता निरीक्षक नियुक्त करीत आहेत.
केंद्र सरकाच्या वतीने लवकरच स्वच्छ शहर सर्वेक्षण केले जाणार असून, त्यासाठी महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी नियुक्त नोडल आॅफिसर हे वर्ग दोनचे असणे आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, त्यानंतरदेखील कामाच्या सोयीने स्वच्छता ाणि विभागीय स्वच्छता निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या या चतुर्थश्रेणी कामगारांना ही जबाबदारी दिली जात आहे. त्यांच्याकडे स्वच्छतेच्या कामांच्या सर्वेक्षणाबरोबरच कर्मचाऱ्यांच्या सेल्फी हजेरी तपासणीचे कामदेखील देण्यात आले आहे. त्यातून वाद झडत आहेत.