नाशिकच्या जिल्हा परिषदेतील कारकून निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 05:15 PM2020-06-06T17:15:43+5:302020-06-06T17:16:42+5:30
चौकशीत तूर्त कारकून दोषी आढळल्याने मुख कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी त्याला निलंबित केले आहे. स्टॅलिन बिद्री शहा असे त्याचे नाव असल्याचे सांगण्यात आले.
नाशिक : वित्त विभागाची अनुमती नसतानाही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या एका कारकुणाने परस्पर कामाची निविदा प्रसिद्ध केल्याची बाब उघडकीस आली आहे. या घटनेमुळे बांधकाम विभाग व ठेकेदारांचे संगनमत पुन्हा स्पस्ट झाले आहे, या घटनेची दखल घेत सदर कारकुणाला तातडीने निलंबित करण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वी ही घटना लक्षात आली. जिल्हा परिषदेत कायमच वादग्रस्त ठरलेल्या बांधकाम विभागाच्या क्रमांक एक मध्ये कार्यरत कारकुणाने एका मोठया कामाच्या निविदेस लेखा व वित्त विभागाने मान्यता दिलेली नसताना परस्पर निविदा ऑनलाईन अपलोड केली. त्या नंतर सदर कामाच्या मंजुरीची फाईल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे यांच्या कडे मान्यतेसाठी गेली असता सदरचा प्रकार उघडकीस आला, या विभागात या पूर्वी देखील असे अनेक चमत्कारिक प्रकार घडले आहेत, त्यात एकट्या कर्मचाऱ्यांना दोष देता येणार नाही, काही वरिष्ठ अधिकारी यात सहभागी असून ते वेळोवेळी उघड झाले आहे, सध्याच्या प्रकरणात असाच काही प्रकार घडला असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र चौकशीत तूर्त कारकून दोषी आढळल्याने मुख कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी त्याला निलंबित केले आहे. स्टॅलिन बिद्री शहा असे त्याचे नाव असल्याचे सांगण्यात आले.