पिंपळगाव बसवंत : महाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक विभाग अराजिपत्रत अधिकारी व कर्मचारी संघटनेमार्फत मांडलेल्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. या संदर्भात अनेकदा निवेदने सादर दिलेली आहेत. मात्र शासनाला जाग येत नसल्याने पिंपळगावसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात बेमुदत लेखणीबंद आंदोलन करण्यात येत आहे. यामुळे पिंपळगावच्या दुय्यम निबंधक कार्यलायाचे कामकाजही बंद असल्याने दस्त नोंदणीचे कामकाज ठप्प झाले आहे.संजय गांगुर्डे यांनी याबाबत माहिती दिली असून, लेखणीबंद आंदोलनामुळे काम ठप्प झाले असून दस्त नोंदणीसाठी नागरिकांनी येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व संवर्गातील रखडलेल्या पदोन्नत्या तात्काळ कराव्यात, कोरोना महामारीमुळे मुद्रांक विभागातील सर्व कर्मचारी शासनाचे 30 टक्के उपस्थितीचे आदेश असताना 100 टक्के उपस्थितीमध्ये काम करत आहेत. मात्र विभागातील कर्मचार्यांसाठी मागणी करु नही जीवन सुरक्षा विमा कवच लागू केलेले नाही. कोविडमुळे आतापर्यंत 6 अधिकारी व कर्मचार्यांचा मृत्यू झालेला आहे. तुकडेबंदी कायद्याने होणार्या कारवाया, रेरा कायद्यामध्ये होणारी कार्यवाही, सह दुय्यम निबंधक वर्ग-2 व दुय्यम निबंधक श्रेणी-1 संवर्गाचे एकत्रीकरण व्हावे, हार्डवेअर आदि साहीत्य मिळावे, आयकर विवरणपत्र, पोलीस व इतर विभागाकडून मागणी केल्या आहेत.कोटविविध मागण्यांबाबत शासनाला जाग यावी म्हणून बेमुदत लेखणीबंद आंदोलन उद्यापासून करीत आहोत. यामुळे दस्त नोंदणीसह कार्यालयात कोणतेही कामकाज होणार नाही. नागरिकांनी याबाबत सहकार्य करावे.- संजय गांगुर्डे, दुय्यम निबंधक, पिंपळगाव बसवंत
दुय्यम निबंधक कार्यालयात लेखणीबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 9:28 PM
पिंपळगाव बसवंत : महाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक विभाग अराजिपत्रत अधिकारी व कर्मचारी संघटनेमार्फत मांडलेल्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. या संदर्भात अनेकदा निवेदने सादर दिलेली आहेत. मात्र शासनाला जाग येत नसल्याने पिंपळगावसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात बेमुदत लेखणीबंद आंदोलन करण्यात येत आहे. यामुळे पिंपळगावच्या दुय्यम निबंधक कार्यलायाचे कामकाजही बंद असल्याने दस्त नोंदणीचे कामकाज ठप्प झाले आहे.
ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : दस्त नोंदणीसह कामकाज ठप्प