नाशिक : शहरातील पंचवटी येथे घंटागाडी कामगार युनियनच्या वादातून अचानक शुक्रवारी (दि.३१) ५० घंटागाड्या बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांचे हाल झाले. महापालिका मात्र या प्रकाराची गंभीर दखल घेत घंटागाडी कामगार संघटनेचा नेता आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या विरोधात साथरोगप्रतिबंधिक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असून, रुग्णसंख्या लक्षणीय आहे. अशावेळी शहरात स्वच्छता राखण्याची गरज आहेच, परंतु प्रतिबंधित क्षेत्रात रुग्णांच्या घरातील कचरा घेण्यासाठी स्वतंत्र घंटागाड्यादेखील नियुक्त आहेत अशावेळी घंटागाड्या बंद ठेवणे अडचणीचे आहे. त्यातच घंटागाडी ठेकेदाराने केवळ पंचवटीच नाही तर अन्य भागांत शनिवारपासून घंटागाड्या बंद करण्याची धमकी दिल्याने महापालिकेने हे कठोर पाऊल उचलल्याचे घनकचरा विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी सांगितले.पंचवटीत ५० घंटागाड्या असून, त्यावर सकाळ शिफ्टमध्ये १४५ कामगार काम करतात. सर्व घंटागाड्या तपोवन मलनिस्सारण केंद्राच्या जागेत उभ्या असतात. या कामगारांची श्रमिक सेवा संघाची युनियन असून, त्यातील एका कामगाराने युनियन सोडल्याने वाद निर्माण झाला, असे सामजते. या कामगारास काढून टाकावे यासाठी संघटनेचे नेते महादेव खुडे आग्रही होते. त्यास ठेकेदाराने दाद न दिल्याने त्यांनी घंटागाड्याच बाहेर येऊ दिल्या नाहीत. प्रभारी विभागीय स्वच्छता निरीक्षक दीपक चव्हाण यांना तसेच ठेकेदार योगेश गाडेकर यांनादेखील शिवीगाळ केली. इतकेच नव्हे तर सिडको आणि नाशिकरोड भागातदेखील कचरा उचलण्याचे काम शनिवारपासून कसे पाहतो अशी धमकी खुडे आणि त्यांच्या साथीदारांनी दिली अशी तक्रार आहे. त्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून महादेव खुडे, शिवनाथ जाधव, विठ्ठल शिंदे, जयेंद्र पाडमुख, सुभाष गवारे, नितीन शिराळ यांच्याविरोधात पंचवटी-आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, महादेव खुडे यांनी ठेकदार गाडेकर यांनी नियुक्त केलेल्या सुपरवायझरचा भाऊ गोरख लोंढे याच्या विरोधात तक्रार पोलीसात दिली आहे. त्याने पोलीसांसमोर आपल्याला शिवीगाळ केल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मुळातच सफाई कामगार असलेल्या एकाला सुपरवायझर बनवून ठेकेदार दहशत निर्माण करीत असल्याचा दावा खुडे यांनी केला आहे.पंचवटीत ५० घंटागाड्या असून, त्यावर सकाळ शिफ्टमध्ये १४५ कामगार काम करतात. सर्व घंटागाड्या तपोवन मलनिस्सारण केंद्राच्या जागेत उभ्या असतात. कामगारांची श्रमिक सेवा संघाची युनियन असून, त्यातील एका कामगाराने युनियन सोडल्याने वाद निर्माण झाला, असे सामजते. प्रकरण पोहोचले पोलीस ठाण्यापर्यंत.
युनियनबाजीतून घंटागाड्या बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 11:57 PM
नाशिक : शहरातील पंचवटी येथे घंटागाडी कामगार युनियनच्या वादातून अचानक शुक्रवारी (दि.३१) ५० घंटागाड्या बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांचे हाल ...
ठळक मुद्देकोरोनात संकट : मनपाकडून साथप्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल