नाशिक : नोकरी, व्यवसाय, घर सांभाळून शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना किंवा उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्यांना कला, वाणिज्य, विज्ञान व कृषिक्षेत्रासह कौशल्याधारित असंख्य पर्याय उपलब्ध करून देताना ‘एक प्रतिज्ञा असे आमुची ज्ञानाची साधना ! चिरंतन ज्ञानाची साधना!’ हे कुसुमाग्रजांनी लिहिलेले विद्यापीठ गीत अभिमानाने मिरविणाºया या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने अनेक मोठी आव्हाने पादाक्रांत केले आहे. नव्याने समोर आलेल्या कृषी पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या बाबतीत यूजीसीने निर्माण केलेला अडसरही कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्या प्रयत्नांनी लवकरच दूर होणार आहे. त्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयापर्यंत विद्यापीठाला भूमिका मांडावी लागली असून, विद्यापीठाने मनुष्यबळ विकास मंत्रालयापर्यंत केलेल्या पाठपुराव्यामुळे मंत्रालय सचिवांनी यूजीसीला पुन्हा एकदा विद्यापीठातील कृषी अभ्यासक्रमांची पडताळणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्याची माहिती कुलगुरू प्रा. वायुनंदन यांनी तिसाव्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी बोलताना दिली असून, कृषी पदवी अभ्याक्रमाविषयी निर्माण झालेला अडसर लवकरच दूर होईल, असा विश्वासहीत्यांनी यावेळी व्यक्त केला.जगभरात आज दुरस्थ शिक्षण व मुक्त शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानेही काळाची पावले ओळखत शिक्षणाच्या सर्वच क्षेत्रांत प्रगती साधून, अद्ययावत बदल केले.शिक्षणक्रम, अभ्यासकेंद्रे, मार्गदर्शक, प्राध्यापक, विद्यार्थी या सर्वांच्या सहकार्याने आपले अनोखे स्थान प्राप्त केले आहे. अभ्यासकेंद्रे, पाठ्यपुस्तकांचा दर्जा, मूल्यमापन, गुणवत्ता, ई-लर्निंगची उपलब्धता, उत्तीर्ण होण्याचे प्रमाण, व्यवहारातील पारदर्शकता, समाजातील विशेष वंचित घटकांसाठी विशेष शिक्षणक्रम आणि शिक्षणप्रक्रियेला सहाय्यभूत अशी कार्यक्षम व्यवस्था उभारली आहे. गत तीस वर्षांत विद्यापीठाने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन केला.विशेष म्हणजे राज्याच्या कृषी क्षेत्रात सुधारणा करून फलोत्पादान क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर ठेवण्यात मुक्त विद्यापीठाच्या कृषिविज्ञान केंद्राचे योगदान मोठे आहे. महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, मुक्त विद्यापीठाच्या कृषिविज्ञान शाखेतून आजवर दोन लाख ६३ हजार विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. त्यापैकी अनेक जण शासकीय सेवेत, काही खासगी सेवेत तर काही विद्यार्थ्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला.सुमारे एक लाख विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत. कृषिविज्ञान प्रत्यक्ष शेतात नेऊन यशस्वी करण्यासाठी १९९४ मध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांनी या विद्यापीठात कृषिविज्ञान केंद्राची स्थापना केली. कष्टकरी, शेतकरी, ग्रामीण युवक-युवतींना कृषितंत्रज्ञानाचे अद्ययावत व्यावसायिक प्रशिक्षण देणे हे सर्वांत महत्त्वाचे कार्य या केंद्रामार्फत केले जाते. शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजांचा आणि संबंधित प्रदेशातील हवामान, पिके, साधनसामग्री या बाबींचा बारकाईने विचार करून प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र विद्यापीठातर्फे चालविला जाणारा कृषी पदविका आणि कृषी पदवी अभ्यासक्रम गेल्या काही दिवसांपूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या धोरणामुळे संकटात आला होता. मुक्त विद्यापीठांना तंत्रशिक्षण देण्यास बंधन घालण्यात आल्यानंतर मुक्त विद्यापीठालाही तसे पत्र प्राप्त झाले. परंतु, अशा प्रकारे कृषी अभ्याक्रम बंद केल्यामुळे केवळ विद्यापीठाचा अभ्यासक्रमच नव्हे, तर महाराष्ट्रभरातील शेतीक्षेत्रात गुंतलेल्या शेतकºयांच्या कृषी तंत्रज्ञानाचा आधारच संपुष्टात येईल, ही गोष्ट लक्षात घेऊन कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी यांनी यूजीसीच्या निर्णयाचा विरोध केला. त्याविरोधात अपील केले. तसेच केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाची आणि हा अभ्यासक्रम चालविणाºया संस्थांची पडताळणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.कृषी पदवी आणि पदविकेचा अभ्यासक्रम पारंपरिक विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमध्ये चालविले जात असल्याने त्याठीकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध आहे. शिवाय तंत्रशिक्षणाचे सर्व निकष पूर्ण करून हा अभ्यासक्रम चालविला जात असल्याने यूजीसीला पडताळणी करताना कोणतीही उणीव यात आढळणार नाही.- ई. वायुनंदन, कुलगुरू
कृषी अभ्यासक्रमाविषयीचे अडसर लवकरच दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 1:08 AM