शेतमाल विक्रीची सहकारी  गृह निर्माण सोसायट्यांना मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 01:33 AM2018-10-25T01:33:06+5:302018-10-25T01:33:38+5:30

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कृषी मालाला शहरी भागात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच शहरी नागरिकांना ताजा व स्वस्त दरात भाजीपाला, कृषी उत्पादने मिळण्यासाठी राज्याच्या सहकार व पणन विभागाने सहकारी गृह निर्माण संस्थांमध्ये अशा प्रकारचा माल विकण्यास परवानगी दिली आहे. गृह निर्माण संस्थेने आपल्या आवारातच यासाठी शॉप उभारून सदस्यांसाठी स्वस्त दरात माल विक्रीची मुभा देण्यात आली आहे.

Co-operative housing societies are allowed to sell commodities | शेतमाल विक्रीची सहकारी  गृह निर्माण सोसायट्यांना मुभा

शेतमाल विक्रीची सहकारी  गृह निर्माण सोसायट्यांना मुभा

Next

नाशिक : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कृषी मालाला शहरी भागात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच शहरी नागरिकांना ताजा व स्वस्त दरात भाजीपाला, कृषी उत्पादने मिळण्यासाठी राज्याच्या सहकार व पणन विभागाने सहकारी गृह निर्माण संस्थांमध्ये अशा प्रकारचा माल विकण्यास परवानगी दिली आहे. गृह निर्माण संस्थेने आपल्या आवारातच यासाठी शॉप उभारून सदस्यांसाठी स्वस्त दरात माल विक्रीची मुभा देण्यात आली आहे.
अटल महापणन विकास अभियानांतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून, यापूर्वीही शासनाने खरेदी-विक्री संघ, विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून हा प्रयोग करून पाहिला होता. परंतु त्याला ग्राहकांअभावी प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या योजनेत थोडा बदल करून त्यात सहकारी गृह निर्माण संस्थांना प्राधान्य देण्यात आले आहे. या योजनेमागचा हेतू म्हणजे कृषी उत्पादनांची विक्री व्यवस्था उभारणे, शेतकरी व ग्राहक यांच्यातील मध्यस्थ दूर करणे, कृषी मालाला रास्त दर मिळवून देण्याचा आहे. सध्या शेतकºयाचा माल बाजार समितीशिवाय अन्य ठिकाणी विकला जात नाही किंबहुना त्याने उत्पादित केलेला सर्वच माल बाजार समिती वगळता कोणी घेतही नाही. अशा परिस्थितीत व्यापाºयांकडून शेतकºयांची अडवणूक केली जात असल्याने त्यावर सहकारी गृह निर्माण सोसायट्यांमध्येच शेतकºयांच्या मालाची विक्री व्यवस्थेची साखळी उभारून दोन्ही घटकांचा त्यात लाभ होणार असल्याचे पणन महामंडळाचे म्हणणे आहे. त्यासाठी शेतमाल तयार करणारे घटक, शेतकरी गट, उत्पादक कंपन्या, महिला बचत गट अशा सर्वांना या योजनेत सहभागी होता येणार आहे.
वेळ, खर्चाची बचत होणार
सोसायटीच्या आवारातच शॉप उभारून स्वस्त दरात सभासद सदस्यांना ताजा माल उपलब्ध करून त्यातून मिळणाºया उत्पादनातून शॉपचा खर्च भागविणे शक्य आहे. त्यासाठी सोसायटीत किमान शंभर स्क्वेअर फूट शॉप उभारणे गरजेचे असून, संस्थेने आॅर्डर दिल्याप्रमाणे संबंधित उत्पादक घरपोहोच माल पुरवतील व तो स्वस्त दरात उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. त्यामुळे उत्पादकाला हक्काचा ग्राहक मिळेल व ग्राहकालाही दाराशीच स्वस्त दरात ताजा माल मिळून वेळ व खर्चात बचत होणार आहे.

Web Title: Co-operative housing societies are allowed to sell commodities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.