अंदरसुल जयहिंदवाडी शाळेत पकडला कोब्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 06:57 PM2021-02-28T18:57:09+5:302021-02-28T19:00:23+5:30
अंदरसुल : जयहिंदवाडी शाळेत आलेला कोब्रा पकडून सर्पमित्रांनी त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शनिवारी (दि.२७) दुपारी १.३० वाजेच्या सुमारास सर्पमित्र सोमनाथ गुंड व गुड्डू हिंगे यांच्या सहा फूट लांबीचा, तीन इंच जाडीचा विषारी जातीचा कोब्रा (नाग) पकडला.

शिक्षक शरद संसारे व जनार्दन सोनवणे हे स्वच्छतागृहाकडून येत असतांना गव्हाच्या शेतातून कोब्रा नाग त्यांना आवारात येतांना दिसला. किचन शेडच्या मागील बाजूस असलेल्या पत्र्याच्या फटीत साप घुसण्याचा प्रयत्न करत असतांना दोघांनी शेजारी असलेल्या शिक्षक भारत कानडे व विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले. शरद संसारे यांनी सर्पमित्रांना संपर्क केला. सर्पमित्र सोमनाथ गुंड व गुड्डू हिंगे शाळेत हजर झाले. त्यांनी कोब्राला पकडत वनात सोडले.
मुख्याध्यापक भास्कर कुडके, शिक्षक शरद संसारे, भारत कानडे, जनार्दन सोनवणे, गोकूळ गायकवाड, जगदीश पाटील ग्रामस्थ यांनी सर्पमित्रांचा सत्कार केला.